SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाच्या कोल्हापूर आईस, गोकुळ मिल्क सप्लायर आणि गायत्री कोल्ड स्टोरेजच्या व्यवहारांची माहिती द्या......शिरोळमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य शिल्पाचे १३ मे रोजी ऐतिहासिक अनावरणडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बी.आय.एस.ए जी-एन मध्ये निवडघाटगे- मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनीही एकसंध व्हावे; मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन बंद प्रकल्पांना गती देण्यासाठी महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांची पाहणी; विविध ठिकाणी विकास आराखडे सादर करण्याच्या सूचनाअँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली (पु.) चा दहावीचा निकाल ९६ टक्के; सफीया नदाफ प्रथमस्वाभिमानाचा मेरुमणी: महाराणा प्रतापकोल्हापूर महानगरपालिकेकडून उचगावमधील २०४ अनधिकृत बांधकामांना पुन्हा नोटीसकोल्हापुरात वृद्धाला लुटणारी सराईत इराणी टोळी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्तराज्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल 92.09 टक्के

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाच्या कोल्हापूर आईस, गोकुळ मिल्क सप्लायर आणि गायत्री कोल्ड स्टोरेजच्या व्यवहारांची माहिती द्या......

schedule09 May 26 person by visibility 218 categoryउद्योग

◼️सभासद संघांची संस्थांची गोकुळ प्रशासनाकडे मागणी
◼️अदा झालेल्या रक्कमेसह सालनिहाय सविस्तर माहिती द्या  
      
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या मुंबईतील पॅकिंग वितरण व्यवस्थेसाठी "कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोरेज",  पुण्यातील वितरण व्यवस्थेसाठी "गोकुळ मिल्क सप्लायर्स", पुण्यातील पॅकिंग ठेका असलेल्या "गायत्री कोल्ड स्टोरेज" हे ठीके असलेल्या कंपन्यांची सविस्तर माहिती द्या, अशी मागणी गोकुळ दूध संघाच्या सभासद संस्थानी केली आहे. गोकुळ दूध संघाच्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधींनी दूध संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प स्थळावर यांची भेट घेतली. यावेळी सह्या केलेले निवेदन मुख्य प्रशासक संजयकुमार सुद्रिक व प्रशासकीय मंडळातील सदस्य प्रदीप मालगावे, सुनील धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परुळेकर यांच्याकडे दिले.
                
गोकुळ दूध संघाचे मुख्य प्रशासक संजयकुमार सुद्रिक आणि प्रशासकीय मंडळाच्या नावाने लिहिलेल्या या निवेदनात म्हटले आहे, गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या दूध संस्थांचे आम्ही  प्रतिनिधी आहोत. गोकुळ दूध संघाच्या मुंबई येथील पॅकिंग वितरण व्यवस्थेसाठी काम करीत असलेल्या "कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोरेज",  पुणे येथील वितरण व्यवस्थेसाठी असलेल्या "गोकुळ मिल्क सप्लायर्स", या वितरण व्यवस्था यंत्रणेची आणि गोकुळ दूध संघाच्या पुणे येथील पॅकिंग ठेका असणारे "गायत्री कोल्ड स्टोरेज" ही फर्म  यांची सविस्तर माहिती तातडीने द्या.
                    
संस्थाप्रतिनिधींना उत्तर देताना मुख्य प्रशासक संजयकुमार सुद्रिक म्हणाले, कोणताही राजकीय दबाव न घेता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज करू. संस्थाप्रतिनिधींनी या निवेदनाद्वारे मागितलेली माहिती लवकरात लवकर देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
              
■ यावेळी गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेले मुद्दे असे.....,
    
□  गेली पाच वर्ष म्हैस व गाईच्या दुधाला उच्चांकी दरासह सर्वच पातळ्यांवर प्रगती केली असताना प्रशासकीय येणे  ही शेतकऱ्यांचे दुर्दैवच आहे.
        
□ या आधीच्या संचालक मंडळांनी सत्ता पै-  पाहुण्यांसाठी राबवली. या संचालक मंडळाने सत्ता शेतकऱ्यांसाठी राबवली. याचा सदसद विवेकबुद्धीने विचार करा.
          
□ गोकुळ दूध संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक कणा. या संघामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. त्यामुळेच या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत.
          
□ गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दर महिन्याच्या तीन, १३  आणि २३ या शेतकऱ्याला दूध बिल मिळणाऱ्या हक्काच्या आणि खात्रीशीर तारखा आहेत.
           
□ मुख्य प्रशासक व प्रशासकीय मंडळांनी कोणताही राजकीय दबाव न घेता दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची केली मागणी.
     
◼️कंपन्यांचे मालक, अदा झालेली रक्कम याची मागितली माहिती.....!
गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या संस्था प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे ठेकेदार कंपन्यांच्या मालकांची नावे,  ठेके कधीपासून सुरू झाले, सदर कंपन्यांच्याकडे त्यांच्या कामापोटी किती रक्कम अदा झाली याची सालनिहाय सविस्तर माहिती मागितलेली आहे....!

        
गोकुळ दूध संघाच्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधींनी गोकुळ दूध संघाचे मुख्य प्रशासक संजयकुमार सुद्रिक व प्रशासकीय मंडळाकडे सविस्तर माहिती निवेदनाद्वारे मागितली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes