SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रणव मोरे बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यरोटरी क्लब ऑफ गार्गीजचे बारावे "यामिनी" प्रदर्शन १९,२०.२१ सप्टेंबर रोजी आयोजितराधानगरीत रानभाजी महोत्सव संपन्नव्यक्तीने कलासक्त असणे गरजेचे : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदनकोल्हापूर : हातभट्टीची दारु तयार करणारे 07 अड्डे उध्वस्त, एकूण 3लाख 21 हजार ,800/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्तटीईटी सक्तीविरोधात शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी; आमदार सतेज पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणीराज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईत रेल्वेने आगमन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांचे स्वागत; उद्या राज्यपालांचा शपथविधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध, चित्रकला स्पर्धामुंबईच्या राज्य निवड क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकरची राज्य संघात निवड

जाहिरात

 

राधानगरीत रानभाजी महोत्सव संपन्न

schedule15 Sep 25 person by visibility 60 categoryराज्य

कोल्हापूर  : महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत राधानगरीतील तारळे खुर्द येथील श्री साई संस्कृतिक भवनात 'तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव' मोठ्या उत्साहात आज संपन झाला.

 या महोत्सवाचा उद्देश नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे मानवी आरोग्यासाठी असलेले महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य आणि औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचवणे हा होता. तसेच, या रानभाज्यांच्या विक्रीतून स्थानिक शेतकऱ्यांना आणि बचत गटांना आर्थिक फायदा मिळवून देण्यावरही भर देण्यात आला.

या कार्यक्रमास राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समिती सदस्य अध्यक्षस्थानी अशोक फराकटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे,  राधानगरी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, सरपंच व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 राज्य समन्वयक तसेच मार्गदर्शक आनंदा शिंदे यांनी रानभाजी विषयी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय समन्दित नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प प्रमुख डॉ. योगेश बन यांनी पौष्टिक तृणधान्य याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात रानभाजी प्रदर्शन, रानभाजी पाककला स्पर्धा व रानभाजी विक्रीची व्यवस्था होती. 

रानभाजी प्रदर्शनामध्ये ४० महिला व शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता.  तालुक्यामध्ये आढळणाऱ्या उंबर, नाल, कुई, शेवगा, हादगा, बाघाडी, काटेमाठ, मोहोर, टाकळी अशा एकूण ४२ प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता.

रानभाजी पाककला स्पर्धेमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. यामध्ये एकूण ६४ महिला व गटांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये १२८ प्रकारच्या पाककृती तयार करुन आणल्या होत्या. या महोत्सवाला शेतकरी, महिला बचत गट आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रानभाजी पाककला स्पर्धेमध्ये अमती शिल्पा संतोष पाटील, सायली शंकर सारंग, शितल केरबा शेलार, प्रज्ञा निलेश पाटील व सारिका श्रीकांत यादव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. राज्य पुरस्कृत यांत्रिकरण योजना अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये ट्रॅक्टर व पावर ट्रेलर वितरित करण्यात आले. मनरेगा अंतर्गत ऊसाच्या बांधावर नारळ उपक्रमातील शेतकऱ्यांना नारळ रोपे देण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत लामार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  

कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व आभार प्रदर्शन  राधानगरी तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes