प्रणव मोरे बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य
schedule15 Sep 25 person by visibility 88 categoryक्रीडा

कोल्हापूर : अनुज् चेस ॲकॅडमीच्यावतीने मुरगूड विद्यालय (ज्यू. कॉलेज), मुरगूड येथे दि 14 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय 16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य शाम पाटील सर व उपमुख्याध्यापक सुर्यवंशी यांच्या हस्ते व कृष्णात मस्कर यांचे प्रमुख उपस्थितीत पटावरील चाल करून करण्यात आले.
स्पर्धेमध्ये 5 फेऱ्या घेण्यात आल्या. प्रणव मोरे याने 5 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. आदित्यराज निंबाळकर याने 5 (प्रोग्रेसिव) गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.
📌स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे
▪️तृतीय क्रमांक अच्युत दवणे 4.5 गुण
▪️चौथा क्रमांक स्वराज देसाई 4 गुण
▪️पाचवा क्रमांक समर्थ घुले 4 गुण
▪️उत्कृष्ट विद्यार्थिनी - श्रावणी व्हटकर
📌16 वर्षाखालील इतर विजेते
▪️8 वर्षाखालील
प्रथम क्रमांक सौमित्र जोशी 4 गुण
▪️द्वितीय क्रमांक जय पाटील 3.5 गुण
▪️उत्कृष्ट विद्यार्थिनी - काव्या जिंजे
📌10 वर्षाखालील
▪️प्रथम क्रमांक ओम इंगळे 4 गुण
▪️द्वितीय क्रमांक श्रेयस पाटील 4 गुण
▪️उत्कृष्ट विद्यार्थिनी - ऋतूजा हेंडगे
📌12 वर्षाखालील
▪️प्रथम क्रमांक आराध्य नाईक 3.5 गुण
▪️द्वितीय क्रमांक सार्थक घुले 3.5 गुण
▪️उत्कृष्ट विद्यार्थिनी - श्रावणी पोवार
📌14 वर्षाखालील
▪️प्रथम क्रमांक ओजस व्हनमाने 4 गुण
▪️द्वितीय क्रमांक नीता धुलाज 4 गुण
▪️उत्कृष्ट विद्यार्थिनी - प्रगती भानवसे
📌अनुज् चेस अकॅडमी विजेते
▪️प्रथम क्रमांक श्रीनय पालनकर 3 गुण
▪️द्वितीय क्रमांक रणवीर सारंग 3 गुण
▪️तृतीय क्रमांक शिवराज कामटे 3 गुण
▪️चौथा क्रमांक फजल मुजावर 3 गुण
▪️पाचवा क्रमांक सौरभ घुले 3 गुण
▪️उत्तेजनार्थ बक्षीसे :
स्पृहा दवणे व वरद चौगुले
स्पर्धेमध्ये एकूण 84 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून बाबूराव पाटील यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण ज्येष्ठ बुद्धिबळपटू शंकर मेंडके, शंकर सावंत तसेच कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील, आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप सारंग, अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.