SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’बाबत विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळाउत्तम आवाजासाठी योग, प्राणायाम आवश्यक : दैनीआंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन: अनुभव आणि आदराचा उत्सवराजाराम तलावाजवळील थरारक जबरी चोरी २४ तासांच्या आत उघड! ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगतगोकुळ दूध संघ जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा राहावा : आमदार सतेज पाटीलतारदाळ येथे वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुविधा सुरू : आमदार यड्रावकर डीएसओ बुद्धिबळ निवड स्पर्धेत केन चेस अकॅडमीचा ऐतिहासिक यश; १५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवडडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपश्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला 'खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा'; रोख बक्षीसांसह ४१ आकर्षक पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!

जाहिरात

 

दिल्लीत राडा: पीएम निवासस्थानाबाहेर निदर्शनादरम्यान राहुल गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात, धक्काबुक्कीत नाकातून वाहू लागले रक्त

schedule21 Jul 26 person by visibility 556 categoryदेश

नवी दिल्ली : दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर (7 लोक कल्याण मार्ग) विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ मंगळवारी तीव्र आंदोलन पाहायला मिळाले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाद्रा आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले.

निदर्शनादरम्यान राहुल गांधी रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले आणि त्यांनी पोलीस व्हॅनमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे सुमारे 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने ओढत नेले. या झटापटीत राहुल गांधी यांच्या नाकातून रक्त वाहू लागले असून त्यांच्या छातीलाही दुखापत झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

 यापूर्वी, काँग्रेस नेत्यांनी हातात हथकड्या घालून विद्यार्थ्यांवरील दडपशाहीचा सांकेतिक विरोध केला होता तसेच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.

 आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत झालेल्या या तीव्र संघर्षानंतर अखेर पोलिसांनी रात्री साडेनऊच्या सुमारास काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सुटका केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes