SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजाराम तलावाजवळील थरारक जबरी चोरी २४ तासांच्या आत उघड! ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगतगोकुळ दूध संघ जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांचा राहावा : आमदार सतेज पाटीलतारदाळ येथे वाहनांच्या फिटनेस तपासणीची सुविधा सुरू : आमदार यड्रावकर डीएसओ बुद्धिबळ निवड स्पर्धेत केन चेस अकॅडमीचा ऐतिहासिक यश; १५ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवडडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपश्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला 'खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा'; रोख बक्षीसांसह ४१ आकर्षक पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!दुष्काळाच्या छायेत संवेदनशील निर्णय! भागीरथी संस्थेची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा रद्द; बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार“स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा!” प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेशशामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरे

जाहिरात

 

राजाराम तलावाजवळील थरारक जबरी चोरी २४ तासांच्या आत उघड! ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

schedule30 Sep 26 person by visibility 130 categoryगुन्हे

कोल्हापूर : राजाराम तलाव परिसरात तरुणाला मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पसार झालेल्या तीन सराईत चोरांना राजारामपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ३,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे!

फिर्यादी श्रेयश सुनील कोरे (वय २४) हे २८ सप्टेंबर २०२६ रोजी राजाराम तलावाकडून सरनोबतवाडीकडे जात असताना, तलावाजवळ दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. जबर मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून हे लोभी पसार झाले होते. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे वेगाने सूत्रे हालवली. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या:

१. साद फारुख बेपारी (वय १९, रा. ९ वस्ती, मुडशिंगी, कोल्हापूर)
२. प्रफुल्ल सर्जेराव गजबर (वय १९, रा. सरनोबतवाडी, करवीर)
३. रोहन रुपेश पाटील (वय २२, रा. शिवशक्ती स्पोर्ट्स, उचगाव, करवीर)

आरोपींकडून जबरी चोरी केलेल्या १,५०,००० रुपये किमतीच्या सोन्याची चेनचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेली दोन मोटारसायकल असा एकूण ३,००,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे अधिक तपास करत असून, इतर पसार साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes