SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘विज्ञानातील महिला’ विषयावर विद्यापीठात विशेष ग्रंथप्रदर्शनशिक्षणशास्त्र अधिविभागात दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजनडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कारपोषण अभियानात कोल्हापूरचा तिसरा क्रमांककोल्हापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण वाटा विमानतळ उचलेल अशा सेवा आणि सुविधा उभाराव्यातस्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे करु नये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महावितरणकडे मागणीकोल्हापुरात 'माझं शहर, माझी जबाबदारी' स्वच्छता अभियान यशस्वी; महापौर रूपाराणी निकम यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभारप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये 'मराठी राजभाषा दिन' उत्साहात साजराराष्ट्रीय विज्ञान दिन: विज्ञानाचा उत्सव आणि प्रगतीची वाटचालसाखर कारखान्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या : आमदार सतेज पाटील यांची मागणी : विधिमंडळात लक्षवेधीद्वारे वेधले लक्ष

जाहिरात

 

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाला राजारामबापू पाटील साहित्य पुरस्कार

schedule28 Feb 26 person by visibility 103 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय-२०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, शाखेचे अध्यक्ष प्रा. दीपक स्वामी यांनी नुकतीच पुरस्कारांची घोषणा केली.

डॉ. जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा ललित लेखसंग्रह कोल्हापूरच्या भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये मानवतावादाच्या सूत्रामध्ये गुंफलेल्या निवडक ३० लेखांचा समावेश आहे. व्यापक जागतिक समुदायामध्ये मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा आग्रह या लेखनामागे आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे.

डॉ. जत्राटकर यांची ‘निखळ: जागर संवेदनांचा’, ‘समाज आणि माध्यमं’ ही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. त्यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि ध्यास फाऊंडेशन, पलूस आदी संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कारही लाभले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes