SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गॅस टंचाईला चाप! पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर 'कंट्रोल रूम' सज्जसीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतरसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी सुरू : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलशिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहातडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशजीवनात येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा : संग्राम पाटील; डी. वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण गडहिंग्लज-आजरा 'बायपास'साठी धनंजय महाडिक संसदेत कडाडले; वाढत्या अपघातांकडे वेधले लक्ष!‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतराव चव्‍हाण यांना अभिवादन ...परिवहन समितीचे नूतन सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर; केएमटी स्वयंपूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेसुधारित आकृतीबंध आणि फेरीवाला समितीच्या मुद्द्यावरून काँग्रेस-शिवसेना (उबाठा) आक्रमक; आजपासून महापालिकेसमोर लाक्षणिक साखळी उपोषण!

जाहिरात

 

रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट; रत्नागिरी जिल्ह्यात काल ११२.७. मिमी पावसाची नोंद

schedule16 Jun 25 person by visibility 459 categoryराज्य

मुंबई : भारतीय हवामान व विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१६ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ११२.७. मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११०.७ मिमी, मुंबई शहर १००.४ मिमी, मुंबई उपनगर ८६ मिमी, रायगड ७२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १६ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ३५.६, रायगड ७२.१, रत्नागिरी ११२.७,  सिंधुदुर्ग ११०.७,  पालघर ३३.८, नाशिक ५.३, धुळे ६.९, नंदुरबार २.४, जळगाव ५.९, अहिल्यानगर १.५, पुणे २२.१, सोलापूर ०.८,  सातारा १७.१,  सांगली १६.६,  कोल्हापूर ५१.४, छत्रपती संभाजीनगर ११, जालना ३.५, बीड ०.७, लातूर ०.७,  धाराशिव १, नांदेड ०.२,  परभणी ०.३, बुलढाणा ५.१, अकोला ७.४, अमरावती ७.४, यवतमाळ ०.१, वर्धा ०.५, नागपूर ०.४, गोंदिया ४.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवळी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदी पात्रातील नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात रस्ते अपघातात तीन व्यक्तींचा मृत्यू तर सात व्यक्ती जखमी झाल्या असून नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून दोन तर जालना जिल्ह्यात तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात वीज पडून तीन व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाली आहे तर भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर आगीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे. रायगड जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन व्यक्तींचा मृत्यू,  मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी,  बुलढाणा जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू आणि चार व्यक्ती जखमी तर धुळे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती जखमी झाला आहे.  आणि पुणे येथील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शेजारी कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी नदी वरील लोखंडी पूल दुर्घटनेत चार व्यक्तींचा मृत्यू आणि ५१ व्यक्ती जखमी झाल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes