सख्ये भाऊ पोलीस सेवेतून मुक्त
schedule29 Aug 24 person by visibility 321 categoryगुन्हे
कोल्हापूर : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ग्रेड पोलिस उपनिरीक्षक महेश रमेश शिंदे आणि पोलिस नाईक विष्णु रमेश शिंदे विभागीय चौकशीत दोषी ठरलेल्या दोघा सख्या भावांना पोलीस अधीक्षक महेंद्र पांडीत यांनी कोल्हापूर पोलीस दलातून मुक्त केल्याचे आदेश काढले आहेत. चौकशी अहवालानंतर त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
ग्रेड पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे सप्टेंबर १९९१ ला, तर विष्णू शिंदे हे ऑगस्ट २००४ ला भटक्या जमाती ब वर्गातून भरती झाले होते. भरतीवेळी त्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले होते. त्याआधारे त्यांना आरक्षणातून नोकरी मिळाली होती. मात्र त्यानंतर उच्च न्यायालयाने सेवेतील सर्वांची जात पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वारंवार माहिती देवूनही दोघांनीही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही.
विष्णू सध्या पोलिस मुख्यालयात तर महेश राधानगरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल आहे.