SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार यड्रावकर यांचा निर्णायक पाठपुरावासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात स्वच्छता व वर्कशॉप कर्मचाऱ्यांचा सत्कारसंगीताच्या सुरावटीत घामाचा सन्मान! 'संगीतसूर्य'च्या नूतनीकरणाच्या मंचावर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रांगडा कलाविष्कारकोल्हापूर : कपडे आणायला गेलेल्या पत्नीचा निर्घृण खून; नराधम पतीने १० वर्षांचा संसार संपवला!सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेदुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ : लेक लाडकी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार : आदिती तटकरे महाराष्ट्र पोलीस दलाची पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम यशस्वीराष्ट्रीय विनोद दिन: हसण्याचे महत्त्व आणि आनंदोत्सवभाजपा जिल्हा कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

जाहिरात

 

संगीताच्या सुरावटीत घामाचा सन्मान! 'संगीतसूर्य'च्या नूतनीकरणाच्या मंचावर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा रांगडा कलाविष्कार

schedule16 Aug 26 person by visibility 166 categoryमहानगरपालिका

▪️संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणानंतर शुभारंभाचा पहिला मान स्वच्छता कर्मचाऱ्यांना

▪️महापौर रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर शुभारंभाचा पहिला मान आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आला. महापौर  रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेतून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोबल व कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यगृहात विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

तब्बल दोन वर्षांनंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सूर, संगीत आणि कलाविष्काराचा आवाज घुमला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीतसूर्य केशवराव भोसले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महापौर  रूपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ. दीपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, क्रीडा सभापती विजयसिंह खाडे-पाटील, आरोग्य उपसभापती वैभव माने, गटनेता आदिल फरास व नगरसेविका उपस्थित होत्या.

या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वच्छता कर्मचारी राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत सम्राट व शाहिर अमोल बुचडे, सचिन पन्हाळकर व अन्य स्वच्छता कर्मचारी कलाकारांनी गायन, नृत्य व विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. महालक्ष्मी व छत्रपती शाहू महाराज भूपाळी, गणेश वंदन, ‘वसुंधरेवरील भारुड’, स्वच्छता गीत, मर्दानी खेळ आदी कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले.

स्वच्छता कर्मचारी संजय काळे व अमोल कांबळे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनीही ‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी’ हे गीत सादर करून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचारी वर्षभर शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना कला सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकारी व स्वच्छता कर्मचारी यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यासह कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. या कार्यक्रमात कला सादर करणाऱ्या सर्व स्वच्छता कर्मचारी कलाकारांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम काटकर व वर्षा जोशी यांनी केले.

यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सहायक अभियंता सुरेश पाटील, केशराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापक समीर महाब्री, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, संग्रामसिंह निकम व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes