SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाईकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेजबालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध 'सु-मोटो' अवमान कारवाईची नोटीसअग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागतकोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 6 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईप्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शनईद फेस्टिवल भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्ट; दिवाळी सुट्टीनंतर रंगणार स्पर्धा

जाहिरात

 

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

schedule08 Sep 26 person by visibility 173 categoryसामाजिक

जयसिंगपूर : माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस मंगळवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजल्यापासून जयसिंगपूर येथील सहाव्या गल्लीत यड्रावकर यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उद्योगपती, सामाजिक आणि सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संजय पाटील यड्रावकर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

तत्पूर्वी सकाळी संजय पाटील यड्रावकर यांनी पार्वती औद्योगिक वसाहत येथे स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यड्रावकर यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन स्वर्गीय आण्णांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि पुष्पगुच्छ वाहिले. त्यानंतर निवासस्थानी यड्रावकर उद्योग समुहाचे प्रमुख आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने उपस्थित सहकार्‍यांसोबत संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवसानिमित्त यथोचित सन्मान केला आणि त्यांना आशिर्वाद दिले. शुभेच्छा देण्यासाठी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठी गर्दी झाली होती.

उद्योगपती संजय घोडावत, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, विनोद घोडावत, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, मुरलीधर जाधव, तानाजी पवार, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, रेंदाळ जिल्हा परिषद सदस्य शिवाजी जाधव,  जयसिंगपुरच्या मुख्याधिकारी टीना गवळी, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समितीचे सदस्य, विजय मगदूम, दादेपाशा पटेल, तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष मनीषा डांगे,  सर्व नगरसेवक, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, रुस्तुम मुजावर, मामा नीटवे, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयपाल कुंभोजे, प्रताप उर्फ बाबा पाटील, सागर मादनाईक, कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब चौगुले, रणजीत कदम, भाजपा मंडल प्रमुख मिलिंद भिडे, भाजपा जयसिंगपूर शहराध्यक्ष रमेश यळगुडकर, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, राजेंद्र नांद्रेकर, मिलींद शिंदे, प्रकाश झेले, यड्रावकर उद्योग समुहातील सर्व संस्थांचे संचालक व पदाधिकारी, उदय डांगे, रामचंद्र मोहिते (कुरूंदवाड), विद्याधर मरजे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सूतगिरणी संचालक, अधिकारी व कर्मचारी, शरद सहकारी साखर कारखाना संचालक, अधिकारी व कर्मचारी, आर्किटेक्ट इंजिनिअर असोसिएशन जयसिंगपूर, राजर्षी शाहू आघाडी जयसिंगपूर, बाहुबली जिल्हा नागरी पत संस्था, जयसिंगपूर, आजी, माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन, अरूणा रोड गणेश उत्सव मंडळ जयसिंगपूर, नाट्यशुभांगी जयसिंगपूर, क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर, मुस्लिम सुन्नत जमातीचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघटना, वडार समाज बांधव, हडपद समाज बांधव, स्टोन क्रशर असोसिएशन जयसिंगपूर पदाधिकारी यांच्यासह आजी-माजी नगराध्यक्ष नगरसेवक, सहकारी आणि सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांनी संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. 

भ्रमणध्वनीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, स्वप्निल आवाडे, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष उत्तम पाटील, राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes