SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : पाणीपुरवठा विभागाकडील 5 वसुली पथकामार्फत रु.1 कोटी 31 लाख इतकी थकीत रक्कम वसुलकोल्हापूर : घरफाळा थकबाकीपोटी संकल्पसिध्दी अपार्टमेंट मधील 24 मिळकती सिलकोल्हापूर जिल्ह्यातील नियोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्याअन्... आजोबांचा पुनर्जन्म झाला; कोल्हापुरातील लक्षवेधी घटनामाजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजलीमहर्षी शिंदे यांच्याकडून अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सैद्धांतिक मांडणी: संपत देसाई"वाचन संकल्प महाराष्ट्राचा" उपक्रम डॉ. बापूजी साळुंखे इंजीनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहातराष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मेहबूब शेख नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ताराक्कासह 11 जहाल नक्षलवादी शरणतात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मध्ये ‘इंडस्ट्री रेडी इंजिनिअर्स’ कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

जाहिरात

 

मतदानासाठी नियुक्त 16 हजार 237 कर्मचाऱ्यांचे दुसरी सरमिसळ (रॅण्डमायझेशन) संपन्न; विधानसभा निहाय मनुष्यबळाचे वाटप, मतदानाच्या दोन दिवस आधी होणार तिसरी सरमिसळ

schedule31 Oct 24 person by visibility 280 categoryराज्य

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे व सामान्य निरीक्षक यांच्या उपस्थितीत मतदान अधिकारी- कर्मचाऱ्यांची दुसरे सरमिसळ दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. पुढील प्रक्रियेसाठी 16 हजार 237 अधिकारी, कर्मचारी यांची सरमिसळ करण्यात आली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी कर्मचाऱ्यांचे यावेळी वाटप करण्यात आले. 

यावेळी सामान्य निरीक्षक स्वेतिका सचन, अशोक कुमार, मिर तारीक अली, सुहास एस., विश्व मोहन शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, अपर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी गौरव कवाडे उपस्थित होते.

▪️दुसऱ्या सरमिसळनंतर विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त मतदान केंद्र कर्मचारी अधिकारी आकडेवारी पुढीलप्रमाणे –
▪️271- चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 780 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 395 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 385 आहेत.

▪️272- राधानगरी विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 950 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 468 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 482 आहेत.

▪️273- कागल विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 661 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 586 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 075 आहेत.

▪️274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 690 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 475 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 215 आहेत.

▪️275- करवीर विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 659 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 434 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 225 आहेत.

▪️276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 474 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 045 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 429 आहेत.

▪️277- शाहूवाडी विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 586 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 477 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 109 आहेत.


▪️278-हातकणगंले विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 595 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 575 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 1 हजार 020 आहेत.

▪️279- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 351 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 460 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 891 आहेत.

▪️280- शिरोळ विधानसभा मतदारसंघासाठी 1 हजार 491 कर्मचारी देण्यात आले आहेत. यात स्थानिक महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या 548 व इतर मतदार संघातून आलेले पुरुष कर्मचारी 943 आहेत.

या प्रकारे 10 विधानसभा मतदार संघात पुरुष 10 हजार 862 तर महिला 5 हजार 375 असे एकूण 16 हजार 237 अधिकारी कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर मतदानाच्या दोन आधी ‍शवेटचे 3 रे रॅण्डमायझेशन होणार आहे. त्यानंतर कोणत्या मतदान केंद्रावर कोण असणार याची निश्चिती होईल.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes