इचलकरंजी : येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मधील मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये शिकणा-या सहा विद्यार्थ्यांची निवड भारत फोर्ज ने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्हयुव मध्ये झाली आहे. भारत फोर्ज ही ऍटोमोबाईल कंम्पोनंट बनविणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे.
डीकेटीईत प्रत्येक वर्षी या कंपनीच्या वतीने कॅम्पस इंटरव्हयूव घेतले जातात. या कंपनीचा कॅम्पस टॅलेंट पाईपलाईन स्किम अंतर्गत दरवर्षी घेण्यात येतो. याहीवर्षी या स्किमखाली मेकॅनिकल विभागातील रुद्राक्ष जाधव, अक्षय कुलकर्णी यांची निवड झाली इलेक्ट्रीकल विभागातील अभिषेक संकपाळ तर इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन मधून नंदीनी कुंभार, सुषमा आवघडे, नम्रता गौरवाडकर यांची निवड झाली.
शिक्षण पूर्ण व्हायच्याआधीच उज्वल भविष्यासाठी सुसंधी उपलब्ध झाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्यात आनंद व्यक्त होत आहे. भारत फोर्ज लि. पुणे आणि डीकेटीई यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत भारत फोर्ज दरवर्षी त्यांना आवश्यक असणा-या विद्यार्थ्यांची निवड करतात. या निवडीमुळे नामांकित कंपन्यामध्ये प्लेसमेंटमध्ये डीकेटीईने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योगविश्वाला आंतरविद्याशाखीय प्रकल्पांवर काम करु शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे. त्या अनुशंगाने व उद्योगविश्वाची गरज लक्षात घेवून डीकेटीई मध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यामध्ये निवड होण्यास मदत होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांस प्र. संचालिका डॉ. एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख मेकॅनिकल डॉ. व्ही. आर. नाईक, विभागप्रमुख इटीसी डॉ. एस. ए. पाटील, विभागप्रमुख इलेक्ट्रीकल डॉ आर.एन.पाटील टीपीओ प्रा.जी.एस.जोशी व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.