SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीरमुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहाला गालबोट : 'भुलेश्वरचा राजा'ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाचजण जखमीमराठीच्या जादूने 'जेन झी' घायाळ! पुण्यात राहुल गांधींचा हुकमी एक्का; म्हणाले, "पुणे म्हणजे..."ऐतिहासिक विजय: हळदीच्या पेटंटचा लढा भारताने कसा जिंकला?कितीही जन्म घेतले तरी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या ॠणातून उतराई अशक्यमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जयसिंगपुरात ‘नमो उद्यान’चा लोकार्पण सोहळा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ रोजी “श्रावण व्रतवैकल्य” उपक्रमाचे आयोजन : वैशाली राजेश क्षीरसागर यांची माहितीउर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोररंकाळा परिसरात महापालिकेची कारवाई; १४ भटकी गाढवे जप्त‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये व्यासपीठ

जाहिरात

 

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

schedule23 Aug 26 person by visibility 164 categoryशैक्षणिक

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे.

संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५,५२,६७८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १३,४३,४१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित न केल्यामुळे ही विशेष फेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीसाठी २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २३ ऑगस्ट दुपारी १ वाजल्यापासून २४ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती तसेच भाग-२ भरून अर्ज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांनी किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य राहणार आहे.

प्रवेश वाटप प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२६ रोजी राबविण्यात येणार असून त्याचदिवशी दुपारी ३ वाजता प्रवेश वाटपाची यादी, कट-ऑफ यादी तसेच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आवश्यक कागदपत्र पडताळणी व शुल्क भरून प्रवेश निश्चित करावेत. यानंतर २८ ऑगस्ट रोजी संबंधित प्रशासकीय कामकाज, २९ ऑगस्ट रोजी डेटा प्रोसेसिंग आणि ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची पुढील माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes