मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जयसिंगपुरात ‘नमो उद्यान’चा लोकार्पण सोहळा
schedule22 Aug 26 person by visibility 180 categoryराज्य
जयसिंगपूर : शहराच्या विकासामध्ये आणखी एक भर पडत असून जयसिंगपूर येथे ‘नमो उद्यान’ चा लोकार्पण सोहळा पणन व राज्यशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. १ कोटी रुपयांचा निधी तून हे उद्यान उभारण्यात आले आहे.
जयसिंगपूर शहरातील नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन तसेच आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी उद्यानाच्या विकासाला महत्त्व देण्यात येत आहे. उपलब्ध निधीतून उद्यानामध्ये आवश्यक नागरी सुविधा, सुशोभीकरण तसेच नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे हे उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणारे आणि नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
दरम्यान, पणन व राज्यशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी जयसिंगपूर येथील अद्ययावत उभारण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज स्टेडियमची पाहणी केली. स्टेडियममध्ये उपलब्ध सुविधांची माहिती घेत त्यांनी कामाची पाहणी केली. स्टेडियमची उभारणी व सुविधांचे कौतुक करत, शहरातील क्रीडा क्षेत्राला यामुळे निश्चितच चालना मिळेल, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके यांच्यासह नगरसेविका गिरमल कोळी, तेजश्री पाटील, रुपाली बंडगर, सचिन चौगुले, मिनल नांद्रेकर, सचिन निटवे, शकुंतला मछले, लक्ष्मण गोसावी, बजरंग खामकर, महेश कलकुटगी, स्वाती मादनाईक, उज्वला वाघवेकर, पराग पाटील, अशोक मळगे, तबसुम फरास, अर्जुन देशमुख, गीता भोसले, अर्चना आडगाणे, शितल गतारे, प्रविण बलदवा, लता गाडेकर यांच्यासह मिलिंद भिडे, पराग पाटील, राहुल बंडगर, अस्लम फरास, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.