डिजिटल मीडिया कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के, शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला यांची एकमताने निवड
schedule15 Jan 25 person by visibility 134 categoryराज्य
▪️संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडी : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडीत तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा
कोल्हापूर : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणी निवडीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी पार पडली. संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के तर कोल्हापूर शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला यांची एकमताने निवड झाली. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सायली मराठे यांचीही निवड करण्यात आली. तसेच संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुहास पाटील यांची तर पश्चिम महाराष्ट्र संघटकपदी विनायक कलढोणे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वांना राजा माने यांच्या हस्ते निवडपत्रे प्रदान करण्यात आली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडी येथे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याची घोषणा श्री माने यांनी केली.
प्रारंभी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन माने यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, प्रदेश सचिव तेजस राऊत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, प्रदेश कार्यकारणी सदस्य रितेश पाटील, माजी शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. इतर निवडीही यावेळी जाहीर करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे - जिल्हा उपाध्यक्ष - दीपक मांगले, जिल्हा सचिव - संजय सुतार, सहसचिव - इंद्रजित मराठे, संपर्कप्रमुख - सुनील पाटील व राजेंद्र मकोटे, कोल्हापूर शहर उपाध्यक्ष - विजय यशपुत्त, कागल तालुकाध्यक्ष - ओंकार पोतदार, हातकणंगले तालुकाध्यक्ष - कीर्तिराज जाधव, उपाध्यक्ष - राजू म्हेत्रे. शाहूवाडी तालुकाध्यक्ष - सतीश नांगरे, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष - प्रीती कलढोणे, उपाध्यक्ष - सौ. अंजुम मुल्ला, सचिव - संगीता हुग्गे
माने म्हणाले, पत्रकार क्षेत्रात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल मीडिया देखील महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या इतर माध्यमांच्या पत्रकारांप्रमाणे अधिकृत संपादक पत्रकार म्हणून घोषित करावे तसेच त्यांना शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी आपली संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी अधिवेशन आयोजित केले जाते. पहिले अधिवेशन पुस्तकांचे गाव भिलार (महाबळेश्वर) येथे आयोजित करण्यात आले. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांची व्हर्च्युअल उपस्थिती होती. दुसरे अधिवेशन कणेरीमठ, कोल्हापूर येथे झाले, ज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा सावंतवाडीत होणाऱ्या अधिवेशनास कोण प्रमुख पाहुणे असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यावेळी विकास भोसले, सतीश सावंत, प्रशांत चुयेकर, कीर्तीराज जाधव, सचिन बेलेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत जेष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी तर प्रास्ताविक सुहास पाटील यांनी केले. भाऊसाहेब फास्के यांनी आभार मानले. यावेळी जिल्हाभरातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.