SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करा; कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पारंपरिक झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५जागतिक रेबीज दिन: कारणे, परिणाम आणि जनजागृतीकसबा बोरगाव येथे पोहताना धरण परिसरामध्ये तरुण बुडाला; १० तास उलटूनही शोध नाहीकागलमध्ये अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळकागलच्या पाझर तलावातील जलतरण स्पर्धेत २०० हून अधिक जलतरणपटूंचा सहभागमहायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर मंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर कोल्हापुरात ध्वनिप्रदूषणाचा महास्पोट; अनंत चतुर्दशी विसर्जनाने बसवल्या कानठळ्या, महाद्वार रोड आणि पापाची तिकटी ठरले सर्वाधिक कर्णकर्कश!शिवाजी विद्यापीठात ३० सप्टेंबरला ‘व्हॉइस ॲक्टिंग’ कार्यशाळा

जाहिरात

 

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलनात जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार

schedule31 Mar 24 person by visibility 528 categoryसामाजिक

कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलनात १०० टक्के उद्दिष्ट पुर्तता केल्यामुळे या वर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला असून कोल्हापूरचे सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. परवेज पटेल यांनी हा पुरस्कार नुकताच स्वीकारला.

  पुणे सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) डॉ. सुनिता गोल्हाईत, मुंबई, हिंद कुष्ठ निवारण संघ वडाळाचे संचालक उदय ठकार, मुंबई अलर्ट इंडीयाचे संचालक डॉ. अँथोनी स्वामी यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन नुकताच पुरस्कार देण्यात आला.

कोल्हापूर जिल्हयासाठी सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन्ही वर्षी हा पुरस्कार मिळाल्यामुळे ही बाब अभिमानाची आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.व्ही. भोई , ए.एन.शास्त्री, आर.के.पवार यांचे सहकार्य लाभले.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत चालू आर्थिक वर्षात नविन कुष्ठरुग्ण शोध, कार्य, उध्दिष्टांची पुर्तता तसेच विकृती दर्जा २ चे प्रमाण व चाईल्ड रुग्णांचे प्रमाण कमी आहे. तसेच विकृती असलेल्या रुग्णांना भौतिकोपचार व त्याना आवश्यक असलेल्या सेवा १०० टक्के पुरविण्यात आलेल्या आहेत.

यासह सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग व क्षयरोग) पुणे यांनी कोल्हापूर जिल्हयाची राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिलेल्या निर्देशांकानुसार उद्दीष्टांची १०० टक्के पुर्तता केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.

कुष्ठरोग कार्यक्रमाचा तालुका स्तरावर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियमित आढावा, कुष्ठरोग शोध अभियान, स्पर्श जनजागृती अभियान इत्यादी उपक्रम कुष्ठरोग कार्यक्रमामध्ये चांगल्या पध्दतीने राबविल्यामुळे पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती डॉ.परवेज पटेल यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes