SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाईअनधिकृत पाणी जोडण्या, दुकाने व लॉजिंगवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडमाळकर तिकटी, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाईशिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपदउच्च राजकीय-सामाजिक नैतिकतेचे दुसरे नाव म्हणजे डॉ. एन. डी. पाटील: किशोर बेडकीहाळशासनाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन सेवांवरच अवलंबून : राज्य आयुक्त सुधाकर तेलंगफुटबॉलच्या रणांगणात आज 'महामुकाबला': मेस्सीच्या जादूची की केनच्या करिष्म्याची गाजणार दहशत?फीफा वर्ल्ड कप २०२६: स्पेनचा दणदणीत विजय; फ्रान्सला धूळ चारत गाठली अंतिम फेरी!जागतिक युवा कौशल्य दिन: भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरणगौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करण्यास मान्यता

जाहिरात

 

अनधिकृत पाणी जोडण्या, दुकाने व लॉजिंगवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

schedule15 Jul 26 person by visibility 109 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने राबविलेल्या कारवाईचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी कौतुक करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच अनधिकृत हातगाड्या, केबिन्स, पाणी जोडण्या, परवाना नसलेली दुकाने व लॉजिंग यांच्याविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्त डॉ. भारुड यांनी शहरातील विविध विकास प्रकल्प, पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्याने आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

  बैठकीत हलसवडे येथील सोलर प्रकल्प, मल्टीलेव्हल कार पार्किंग तसेच हॉकी स्टेडियम परिसरातील महापालिकेच्या ताब्यात आलेल्या इमारतीसाठी तातडीने निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणीपुरवठा विभागाने गळती दुरुस्तीसोबतच अनधिकृत पाणी जोडण्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करावी, पाईपलाईनला जोडलेल्या मोटारी जप्त कराव्यात तसेच शहरातील गळती दुरुस्तीसाठी वार्षिक एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. परवाना न घेता सुरू असलेली दुकाने, लॉज, मिळकती सील करण्यासाठी घरफाळा व परवाना विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अधिकृत फेरीवाल्यांना जीपीएस आधारित क्यूआर ओळखपत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच परवाना व अग्निशमन विभागाने संयुक्तपणे लॉजिंग व खासगी क्लासेसची तपासणी करुन विना परवाना आस्थापनांवर सीलची कारवाई करण्याचे आदेश दिले जेणेकरून कोणतीही संभाव्य दुर्घटना टाळता येतील.

  यावेळी अतिरिक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, राम काटकर, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, सहा.अभियंता नारायण पुजारी, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, विधी अधिकारी संदीप तायडे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes