SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषदमुंबईत घुमणार युवाशक्तीचा आवाज; कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून ध्येय-धोरणांचा जागर!कोल्हापूर : घरफाळा करात ३० जूनपर्यंत ६ टक्के सवलतशहरातील नाले सफाईमधून 25 डंपर गाळ उठावलिशा हॉटेल ते सदरबाजार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईकोल्हापूर जिल्ह्यात 'जनगणना २०२७' अंतर्गत १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना 'स्वयंगणना' करण्याची सुविधाजागतिक वसुंधरा दिन पर्यावरणीय संकल्पाचा मुहूर्तअश्रूंची धार आणि सुन्न आठवणी: पहलगाम आतंकवादी हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजलीनारी शक्ती वंदन विधेयकाला विरोधाचा निषेध; मुंबईत भाजपचा विराट जन आक्रोश मोर्चानिवडणूक रणधुमाळी: पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषद

schedule22 Apr 26 person by visibility 103 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, शेतीची शाश्वतता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात उद्या “शाश्वत शेती व कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृद्धीसाठी” या विषयावर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. 
शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, स्वयंसहायता बचत गटांच्या महिला तसेच ग्रामीण विकास क्षेत्रातील घटकांसाठी ही परिषद अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी दिली.


या परिषदेत शाश्वत शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पद्धती, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी पीक पद्धतींचा अवलंब, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, जलसंधारणाचे उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून मूल्यवर्धन, उत्पादनाचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठेतील संधी याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून पूरक व्यवसाय, लघुउद्योग, घरगुती उत्पादन आणि उद्योजकतेच्या संधी यावर विशेष सत्र आयोजित केले आहे. यामुळे महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी आवश्यक दिशा मिळेल. परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी अधिकारी, अनुभवी प्रगतशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे सहभागी शेतकरी व महिलांना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रेरणा मिळेल. तसेच शाश्वत शेतीविषयी जागरूकता वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही डॉ. माळी यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes