SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
३०० दिवस, ३०० मैफिली : ‘निक्षय गीत’ उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथशिरोळ तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आदेशलोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचा पाया: राष्ट्रीय पंचायत राज दिवसराज्यात ऊर्जा क्रांती: ५,२०० कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी; कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात उभे राहणार तीन जलविद्युत प्रकल्पविधानसभा निवडणुकांचा धुरळा: पश्चिम बंगालमध्ये ९०%, तर तमिळनाडूमध्ये ८२% मतदान; बारामती-राहुरीचा कौलही मतपेटीत बंदगांधीनगरपर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची तपासणी करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडएचव्हीएसीआर क्षेत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अपार संधी : योगेश गांधीविद्यार्थ्यांसाठी ई - लायब्ररीस प्रारंभक्रीडा प्रबोधनी प्रवेश - 27 एप्रिलपासून निवड चाचणीचे आयोजन कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपद

जाहिरात

 

शहरातील नाले सफाईमधून 25 डंपर गाळ उठाव

schedule22 Apr 26 person by visibility 251 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सुचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत.

 त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या  2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरु आहे.

महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसलेमळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे.

तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes