+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule28 Mar 24 person by visibility 307 categoryमहानगरपालिका
⚫️घरफाळा, पाणी पुरवठा, नगररचना, इस्टेट व परवाना विभागाच्या वसुलीचा आढावा

कोल्हापूर : दि.31 मार्चपर्यंत मोठया थकबाकीदारांवर कारवाई करा, आवश्यकता वाटल्यास संबधीत मिळकत सील करा, थकीत पाणी कनेक्शन खंडीत करा अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या. आयुक्त कार्यालयात आज घरफाळा, पाणी पुरवठा, नगररचना, इस्टेट, परवाना व अग्निशमन विभाग यांची वसुलीबाबत आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत प्रशासकांनी वसुलीच्या सर्व खातेप्रमुखांनी तीन दिवस आपल्या अधिनस्त कर्मचा-यांसह कार्यालयात हजर राहून वसुली करण्याच्या सूचना दिल्या.

    प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी या बैठकीत घरफाळा व पाणी पुरवठा विभागाने जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांना समक्ष भेट घेऊन थकबाकी वसुल करण्याच्या सूचना दिल्या. मुदतीत रक्कम न भरलेस ती मिळकत सील करा. पाणी पुरवठा विभागाने पाणी कनेक्शन खंडीत करा अशा सूचना दिल्या. उर्वरीत तीन दिवसामध्ये सर्व विभागांनी वसुलीचे उद्दीष्ठ पुर्ण करण्याच्या सूचना सर्व खातेप्रमुखांना दिल्या. पाणीपट्टी व घरफाळयाची शासकीय विभागांची वसुलीसाठी त्या कार्यालयात समक्ष भेट घेऊन वसूल करण्याच्या सूचना दिल्या.

            यावेळी उप-आयुक्त साधना पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनिल काटे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, एलबीटी अधिक्षक विश्वास कांबळे, परवाना अधिक्षक राम काटकर, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, पाणी पुरवठा अधीक्षक प्रशांत पंडत उपस्थित होते. 

▪️सुट्टी दिवशीही सर्व नागरीक सुविधा केंद्रे सुरु
शुक्रवार दि.29 व शनविार, दि.30 मार्च 2024 रोजी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व रविवार दि.31 मार्च 2024 रोजी सकाळी 9 ते रात्रौ 11 वाजेपर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्रे सुरु राहणार आहे. तरी शहरातील थकबाकीदार व चालू मागणी असणा-या मिळकतधारकांनी आपला घरफाळा, पाणीपट्टी, परवाना फी भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.