कॅम्पस प्लेसमेंट २०२६ मध्ये तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजचे बहुमोल यश
schedule19 Jan 26 person by visibility 106 categoryशैक्षणिक
वारणानगर : नाविन्यपूर्ण अध्यापन, कौशल्याधारित प्रशिक्षण व उद्योगाभिमुख शिक्षणपद्धतीच्या जोरावर तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेज, वारणानगर यांनी कॅम्पस प्लेसमेंट २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या विविध अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
या कॅम्पस ड्राइव्हमध्ये सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीज प्रा. लि. (३.६० लाख), अदविक हाय-टेक प्रा. लि. (२.५२ लाख), जी. ई. एअरोस्पेस (२.५० लाख), स्पार्क मिंडा (२.४० लाख), प्रिकॉल प्रा. लि. (२.३३ लाख), जॉन डिअर इंडिया प्रा. लि. (२.१६ लाख) व गाडगे पाटील (इंडिया) प्रा. लि. (२.१० लाख रुपये वार्षिक पॅकेज) या नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, विभागस्तरीय मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलचे प्रभावी नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. औद्योगिक गरजांनुसार तांत्रिक कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स व प्रत्यक्ष प्रशिक्षणावर महाविद्यालयाकडून विशेष भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, प्राचार्य पी. आर. पाटील, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. जे. पाटील, मार्गदर्शक डॉ. पी. एम. पाटील, शैक्षणिक समन्वयक एस. व्ही. सुरवे, प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल समन्वयक आर. वाय. पवार तसेच इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर सायन्स व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल व्यावसायिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.