SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणपती बाप्पा मोरया! राज्यभरात गणेशोत्सवाचा मंगल व उत्साही प्रारंभ; लाडक्या बाप्पाचे दणक्यात आगमनगोकुळ निवडणुकीसाठी रमणमळा येथे निवडणूक कार्यालय; नामनिर्देशन प्रक्रियेसाठी वाहतूक नियोजनसांगलीत महाराष्ट्र राज्य फिडे रेटिंग निवड बुद्धिबळ स्पर्धेस अभूतपूर्व प्रतिसाद; राज्यातील २५० खेळाडूंचा सहभागहुपरी येथील आरटीआय कार्यकर्त्यास गंभीर मारहाण करणारे तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईपहिल्या केन चेस सॉल्व्हिंग कपमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी; ६ विजेते घोषितकोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; ३ लाखांच्या एमडीसह तरुण अटकेतगणेश मंडळांना हवे सामाजिक प्रबोधनाचे भान... हिंदी भाषा: भारतीय संस्कृतीचा आणि एकतेचा अनमोल दुवामराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने आणि कायदेशीर तोडगा काढावा: खासदार शाहू छत्रपती महाराजगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम

जाहिरात

 

गणपती बाप्पा मोरया! राज्यभरात गणेशोत्सवाचा मंगल व उत्साही प्रारंभ; लाडक्या बाप्पाचे दणक्यात आगमन

schedule14 Sep 26 person by visibility 153 categoryराज्य

कोल्हापूर: आज गणेश चतुर्थी असून, गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून राज्यभरात उत्साहात प्रारंभ झाला आहे. बुद्धीची देवता श्री गणेश हे सुखाची वार्ता देणारे सुखकर्ता तसेच दुःखाचे हरण करणारे दुःखहर्ता आहेत. अशा आपल्या लाडक्या गणरायाचे म्हणजेच गणपती बाप्पाचे आज राज्यासह देशभरात सर्वत्र जल्लोषात आणि उत्साहात आगमन झाले आहे.

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा आज करण्यात येत आहे. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाच्या आगमनासाठी फुलांची आरास, आकर्षक सजावट, देखावे आणि रोषणाई केली आहे. 

मंगलमूर्तीच्या आगमनाने पुढील १२ दिवस सर्वत्र आनंद, नवचैतन्य, उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes