चिमुरडीची स्कूलबसच ठरली काळ!
schedule30 Aug 24 person by visibility 364 categoryगुन्हे
कोल्हापूर : येवती (ता. करवीर) येथे स्कूल बसमधून उतरून घरी जाणाऱ्या आलिना फिरोज मुल्लाणी (वय ५, रा. येवती, ता. करवीर) या चिमुरडीचा बसखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आलिनाच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इस्पुर्ली (ता. करवीर) येथील दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी नेहमीप्रमाणे गुरुवारी चारच्या सुमारास येवती येथे आली होती. शाळेची केजीच्या वर्गात शिकणारी आलिनाही बसमधून उतरली व जवळच असणाऱ्या घराकडे चालत जात होती. चालकाने इतर विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर बस थोडी पुढे घेतली. त्यावेळी बसचा धक्का लागल्याने ती पडली बसचे मागील चाकात तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जाग्यावरच मृत्यू झाला.
याप्रकरणीबसचा चालक नवनाथ मोहन लोंढे (वय ३१) यांच्यावर इस्पुर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.