SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
१ कोटींहून अधिक किमतीचे ४०० हरवलेले मोबाईल नागरिकांच्या हातात; कोल्हापूर सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!३ वर्ष ९ महिने पोलिसांना गुंगारा देणारा 'ए एस ट्रेडर्स'चा मुख्य एजंट अखेर जेरबंद!कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईयंदा शिवसेनेची “विकासाची भगवी दहीहंडी” : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर; विद्यापीठात वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभअन्न व औषध प्रशासनाचा बनावट अधिकारी बनून हॉटेल व्यावसायिकांना गंडा घालणारा जेरबंद!करवीर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! शिंगणापूर येथील १८.९७ लाखांची घरफोडी अवघ्या ४८ तासांत उघडकीस; गोव्याच्या कॅसिनोत उधळलेली सोन्याची दागिनं हस्तगतरंकाळा तलावावर उद्या शुक्रवारपासून आकर्षक विद्युत रोषणाईसह कारंज्यांचा आनंदडी. वाय. पाटील विद्यापीठात अन्न सुरक्षा, व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हजेरीची अचानक तपासणी ; 58 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

जाहिरात

 

३ वर्ष ९ महिने पोलिसांना गुंगारा देणारा 'ए एस ट्रेडर्स'चा मुख्य एजंट अखेर जेरबंद!

schedule03 Sep 26 person by visibility 150 categoryगुन्हे

◼️गुंतवणूकदारांची कोटींची फसवणूक करून पळालेला कुख्यात आरोपी सोलापूरमधून अटकेत; कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई!

कोल्हापूर: हजारो गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात 'ए एस ट्रेडर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स एलएलपी' कंपनीचा मुख्य फरार एजंट अखेर कोल्हापूर पोलिसांच्या জাळ्यात अडकला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल ३ वर्षे ९ महिने लपून बसलेला मुख्य आरोपी अभिजीत साहेबराव शेळके याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून अत्यंत नाट्यमय रीतीने बेड्या ठोकल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, 'ए एस ट्रेडर्स' आणि त्याच्या इतर उपकंपन्यांच्या संचालक व एजंटांनी गुंतवणूकदारांना वेगवेगळी प्रलोभने व आमिषे दाखवून मोठ्या प्रमाणावर पैशांची गुंतवणूक करून घेतली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा किंवा मुद्दल न देता कंपनीचे कार्यालय अचानक बंद करून टाकत गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भा.द.वि. सं. कलम ४०६, ४०९, ४२०, १२०(ब), २०१ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३, ४ व ८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, सद्यस्थितीत या गुन्ह्याचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी अभिजीत साहेबराव शेळके (रा. स्टींग टॉवर, गवत मंडई, शाहूपुरी, कोल्हापूर) हा पोलिसांना सातत्याने गुंगारा देत फरार होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक  नीलोत्पल (भा.पो.से.) यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक श्रीमती सुवर्णा पत्की आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण यांना या फरार आरोपीचा शोध घेऊन तात्काळ जेरबंद करण्याबाबत कठोर सुचना व मार्गदर्शन केले होते.
पोलीस निरीक्षक  सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यामार्फत मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे हालचाली सुरू केल्या. आरोपी अभिजीत शेळके हा त्याच्या मुळ गावी, म्हणजेच मु. पो. देवडी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.

 या माहितीची खात्री पटताच पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार युवराज पाटील, शुभम संकपाळ आणि राजू कोरे यांच्या विशेष पथकाने तातडीने देवडी येथे धडक देत सापळा रचला. पोलिसांच्या या अचूक कारवाईत फरार एजंट अभिजीत शेळके यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी कोल्हापूर आर्थिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस उपअधीक्षक श्रीमती सुवर्णा पत्की यांच्यामार्फत या प्रकरणाचा अधिक तपास वेगाने सुरू आहे. सर्वसामान्यांच्या कष्टाचे पैसे बळकावून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes