SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपक्ष उमेदवार रिची फर्नांडिस, किशोर यादव यांना सकारात्मक वातावरणमंगळवारी साडेपाच नंतर प्रचारास व जाहिरातींना बंदीनव्या विचाराचा, युवा उमेदवार अश्किन आजरेकरसह महायुतीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबासंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवडशिवाजी विद्यापीठात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंतीतंत्रज्ञान स्वीकारासाठी शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा: डॉ. दीपक ताटपुजेविभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेटसर्व आस्थापनेतील, कारखान्यातील कामगारांना मतदानाचा हक्क बजवण्याकरीता सुट्टी जाहीरनावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीतून घडते यश; तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजची गुणवत्ता परंपरा कायम

जाहिरात

 

महात्मा बसवेश्वर यांच्या वचनसाहित्यात स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश : डॉ. मांतेश हिरेमठ

schedule19 Mar 25 person by visibility 552 categoryसामाजिक

कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य माणसाला निर्भिड आणि स्वाभिमानपूर्वक जगण्याचा संदेश देतात, असे प्रतिपादन डॉ. मांतेश हिरेमठ यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासन आयोजित श्री रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमाले अंतर्गत ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.

डॉ. हिरेमठ म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांचे वचनसाहित्य वाचकाला अंतर्मुख करते. बसवेश्वर जातीव्यवस्थेवर कडक प्रहार करतात. वचनसाहित्यातून वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य त्यांनी केले आहे. वचनसाहित्यात लोकभाषेचा पुरस्कार केलेला पाहावयास मिळतो.

डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, बसवेश्वरांचे वचनसाहित्य भारतीय साहित्यामधील एक अनमोल दागिना आहे. समाजप्रबोधनासाठी वचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रूपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वनिता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. अनिल गवळी, अनमोल कोठाडिया, डॉ.सुखदेव एकल, संशोधक व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes