कळंबा येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील चोरी उघड; सोन्याचे दागिने हस्तगत
schedule11 Sep 24 person by visibility 551 categoryगुन्हे
कोल्हापूर : कळंबा येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील चोरी उघड उघड झाली आहे. १५ तोळे ८ ग्रॅम वजनाचे ८,४५,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. दिपाली सुभाष ताईगंडे, रा.आदिनाथ नगर, कळंबा रोड, कोल्हापूर यांचे राहते घरातून फेब्रुवारीमध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्घाने १५ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेलेने फिर्यादी यांनी तक्रार दिली होती.यावरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे तसेच पोलीस अमंलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रविण पाटील, संतोष बरगे, प्रदिप पाटील, विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांचे तपास पथक तयार करुन नमुद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला. तपास पथकाने गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हा घडलेची पध्दत व फिर्यादी यांचे घरामध्ये काम करणारे कामगार यांची गोपनीय माहिती मिळवून तपास करीत असताना नमुद पथकातील पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरची चोरी फिर्यादी यांचे घरामध्ये कामास येणारा प्रसाद माने याने केली असून तो आज रोजी गुजरी कोल्हापूर येथे चोरीचे दागीने विक्री करिता घेऊन येणार आहे. सहा. पोलीस निरीक्षक मसुटगे व पोलीस पथक यांनी गुजरी कोल्हापूर येथे साध्या वेषात सापळा लावून प्रसाद रघुनाथ माने, वय २० वर्षे, रा.सुर्वे नगर, कळंबा, कोल्हापूर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता त्याने डॉ. दिपाली ताईगडे यांचे घरी चोरी केली असल्याची कबुली दिली.
त्यानंतर त्याच्याकडून चोरीचे १५ तोळे ०८ ग्रॅम वजनाचे ८,४५,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने जप्त केले. नमुद आरोपीस जप्त केले मुद्देमालासह पुढील कारवाई करीता करवीर पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करवी सुरु आहे.
ही कामगीरी पोलीस महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे तसेच पोलीस अर्मलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रविण पाटील, संतोष बरगे, प्रदिप पाटील, विशाल खराडे, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे व नामदेव यादव यांनी केली आहे.