SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
परवान्याविना सुरू असलेले तीन व्यावसायिक आस्थापने महापालिकेकडून सीलई20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या विरोधात आप ने काढली गाडीची अंत्ययात्रा विश्वचषकात 'मेसी'मॅजिक! अंतिम ७ मिनिटांत अर्जेंटिनाचा थरारक विजय; फायनलमध्ये स्पेनशी होणार गाठजागतिक पाळीव प्राणी दिन: मुक्या जीवांचे प्रेम आणि आपले भावनिक नातेराष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा जिल्ह्याला मानप्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाईअनधिकृत पाणी जोडण्या, दुकाने व लॉजिंगवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडमाळकर तिकटी, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाईशिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपदउच्च राजकीय-सामाजिक नैतिकतेचे दुसरे नाव म्हणजे डॉ. एन. डी. पाटील: किशोर बेडकीहाळ

जाहिरात

 

परवान्याविना सुरू असलेले तीन व्यावसायिक आस्थापने महापालिकेकडून सील

schedule16 Jul 26 person by visibility 96 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा व परवाना विभागाने गुरुवारी एलेक्झा पार्क, जुना पुणे-बेंगळुरू रोड येथील व्यावसायिक संकुलात थकीत घरफाळा व विनापरवाना सुरू असलेल्या व्यवसायांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत महापालिकेची आवश्यक परवानगी न घेता व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आलेल्या तीन व्यावसायिक आस्थापनांना सील करण्यात आले.

 

महापालिकेने संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी नोटीस देऊन व्यवसाय परवाना घेण्याबाबत लेखी सूचना दिली होती. मात्र, त्यानंतरही परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने ही कारवाई केली. सील करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये लॅकमे सलून, बेरीज फायनान्स कंपनी आणि इमिरेटस परफ्यूम यांचा समावेश आहे.

ही कारवाई सहा.आयुक्त डॉ. विजय पाटील, कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, कर अधीक्षक श्रीमती अर्चना प्रभावळे तसेच घरफाळा व परवाना विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

 

यावेळी महानगरपालिकेने शहरातील सर्व व्यावसायिकांना व्यवसाय परवाना, थकीत घरफाळा तसेच भाडेकरू वापराच्या मिळकतींसाठी भाडेकराराची प्रत घरफाळा विभागाकडे सादर करून आवश्यक कर आकारणी व व्यवसाय परवाना तातडीने प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या किंवा नियमांचे पालन न करणाऱ्या मिळकतींवर महापालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes