१८५७च्या लढ्याचे आद्य क्रांतिकारक कोल्हापूरचे छत्रपती चिमासाहेब महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
schedule15 May 25 person by visibility 487 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर राजघराण्यात जन्माला आलेले चिमासाहेब महाराज यांनी ब्रिटिश राजवटीस झुगारून विरोध करून दक्षिण भारतात १८५७ मधे लढा उभा केला. कोल्हापूरसह अनेक संस्थानांत जहागीरीत या लढ्याचे लोन पसरले म्हणून महाराजांना पकडून कराची येथे राजकैदी म्हणून ११ वर्षे बंदीवासात ठेवले तेथेच त्यांची अखेर १५ मे १८६९ रोजी झाली. अशा थोर क्रांतीविरला आज अभिवादन करण्यात आले.
छ. चिमासाहेब उद्यान सीपीआर चौक येथिल त्यांच्या पुतळ्याचे पूजन कोल्हापूर महानगरपालिकेचे उपशहर अभियंता सुरेश पाटील यांनी केले तर महाराजांचे वारस सुर्यराज राजेभोसले, वैभवराज राजे भोंसले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याऩतर महाराजांच्या इतिहासिला उजाळा अनिल घाटगे सरांनी करून दिला.
यावेळी किशोर घाटगे, वसंतराव मुळीक, अनिल घाटगे, रविंद्र गुरव, संजय सिंह घाटगे,सागर शिंदे, राहुल फल्ले इ. यावेळी क्रांतीवीर छ.चिमासाहेब महाराज सां.मंडळ ,मराठा महासंघ, कोल्हापूर महानगरपालिका चे अधिकारी, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.