SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अंबाबाई मंदिर परिसर विकास: २ मे पासून मालमत्तांचे प्राथमिक सर्वेक्षण; प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहनपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजनपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात महाडायलिसीस सेवांचा विस्तारजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणीडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथमपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे महाराष्ट्र दिनी वितरणप्रलंबित अत्याचार प्रकरणांचा वेळेत निपटारा करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगोकुळ बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच : भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलमहाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांची भेट

schedule16 Jun 25 person by visibility 679 categoryसामाजिक

कोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक आणि त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांची भेट घेतली. डॉ. पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करून आठवले यांनी शैक्षणिकसह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

केंद्रीय मंत्री आठवले सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सकाळी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर नाम. आठवले यांनी कसबा बावडा येथे यशवंत निवासस्थानी जाऊन पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांची भेट घेतली. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन आठवले यांचे स्वागत केले. 

यावेळी श्री राम सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन राजीव चव्हाण, महादेव लांडगे, मिलिंद पाटील, राजीव चव्हाण,सागर यवलुजे यांनी पुष्पगुच्छ देऊन रामदास आठवले यांचे स्वागत केले. 

 डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय आणि आठवले कुटुंबीयांचे गेल्या अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर आठवले यांनी पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आठवले यांनी डॉ. डी. वाय पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करत शिक्षण क्षेत्रासह विविध विषयावर चर्चा केली.

यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes