SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूरातील सहा तालुक्यांना दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू; जिल्ह्यात बाधितांना मिळणार विविध सवलतीडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातमातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा; कोल्हापुरातून १५ हजार बांधव होणार सहभागीराज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागूज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या गीतांनी जिंकली कोल्हापूरकरांची मनेगणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’ ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचा पर्यावरणस्नेही विक्रम! इराणी खणात तब्बल २,९१९ गणेशमूर्तींचे विसर्जन; प्रशासनाची २५ तासांहून अधिक अविरत सेवाजागतिक कर्णबधिर दिन: समाजाची जबाबदारी आणि समावेशकतासमाज माध्यमांमध्ये असत्य व अर्धसत्याचा महापूर; पत्रकारांनी 'सत्य' जनतेपर्यंत पोहोचवावे : राज्यपाल जिष्णु देव वर्मावारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अंतिम संधी

जाहिरात

 

कोल्हापूरातील सहा तालुक्यांना दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू; जिल्ह्यात बाधितांना मिळणार विविध सवलती

schedule26 Sep 26 person by visibility 149 categoryराज्य

कोल्हापूर :  खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा व चंदगड या तालुक्यांचा समावेश झाल्याने या सहा तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) लागू करण्यात आली आहे.  

‘Trigger-1’ लागू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट यांचा समावेश आहे.

 याशिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे तसेच जलसंधारणाची कामे सुरू करणे आदी उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे.  

 सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व GPS कोऑर्डिनेट्स संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेत पिकांच्या नुकसानीपोटी देण्यात येणारी आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात नमूद आहे.

 शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण व पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येणार असून, बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती व मदतीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून लवकरच आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes