दोन विधानसभा मतदारसंघातील 4 उमेदवारांची माघार
schedule31 Oct 24 person by visibility 364 categoryराज्य
कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 अंतर्गत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवार दि. 29 ऑक्टोबर 2024 होती. दि. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. आज दि. 31 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हयातील दोन मतदारसंघातील 4 उमेदवारांनी आपले 5 उमेदवारी अर्ज निवडणूक प्रकियेतून मागे घेतले आहेत.
मतदार संघनिहाय उमेदवारी नामनिर्देशनपत्र माघार घेणारे उमेदवार पुढीलप्रमाणे –
274 कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ -
1. शौमिका अमल महाडिक (अपक्ष) 1 नामनिर्देशनपत्र,
2. पूजा ऋतुराज पाटील, (अपक्ष) 2 नामनिर्देशनपत्र माघार
276 कोल्हापूर उत्तर मतदारसंघ –
1. मालोजीराजे शाहू छत्रपती (अपक्ष) 1 नामनिर्देशनपत्र
2. वैशाली राजेश क्षीरसागर (अपक्ष) 1 नामनिर्देशनपत्र