SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आयोजनअनधिकृत नळ कनेक्शन व थकबाकीदारांवर महापालिकेची धडक कारवाई; शास्त्रीनगरमध्ये ६ कनेक्शन खंडितगुणवत्तेसोबत ग्राहक सुविधांना ‘गोकुळ’चे प्राधान्य : डॉ. योगेश गोडबोलेटाकळी येथे औद्योगिक वसाहतीसह सैनिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करणार : नामदार उदय सामंतजागतिक हेलियम दिन: एक वैज्ञानिक पर्व आणि महाराष्ट्राचा अभिमानकोल्हापुरात १ कोटी ९५ लाखांची गोव्यातील अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्रडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवडकोल्हापूर : रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम ; विभागांनी समन्वयाने कारवाई करावी : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकेडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा तिसरा हप्ता वर्ग; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद

जाहिरात

 

महागणेशोत्सव : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे 23 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आयोजन

schedule18 Aug 26 person by visibility 54 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये 'राज्य महोत्सव म्हणून घोषित केले. यावर्षी राज्य महोत्सवांतर्गत होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा शासनाने निर्णय घेतला. 

त्यामुळे महाराष्ट्रसोबत देशभरात व जगभरात विविध ठिकाणी जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अत्यंत उत्साहाने व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना देखील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच, त्यांच्या उपक्रमांची दखल शासनातर्फे घेतली जाणार असून, त्यांच्या उपक्रमांना भरघोस बक्षिसांच्या स्वरूपात प्रोत्साहन देखील लाभणार आहे.  

       गणेशमूर्ती ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, ती आपल्या कला, परंपरा आणि सर्जनशीलतेशी जोडलेली आहे. आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेता, आपल्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा अनुभव प्रत्येकासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरू शकतो. याच उद्देशाने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ६ ऑगस्ट रोजी नाशिक येथे गणेश मूर्तिकार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्याला उदंड प्रतिसाद लाभला. तसेच येत्या २३ ऑगस्ट रोजी मुंबई,नागपूर, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेत भाग घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. मर्यादित जागा उपलब्ध आहेत. ३०० रुपये प्रवेश शुल्क असून सर्व सहभागींना मूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती, मूर्ती बनवण्यासाठी आवश्यक साहित्य देण्यात येणार असून सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

 *डिजिटल युगात माणसाला मातीशी जोडणारा उपक्रम* 
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रिनवर व्यस्त राहणाऱ्या हातांना थेट मातीचा स्पर्श व्हावा आणि प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारण्याचा आनंद मिळावा, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये पर्यावरणपूरक उत्सवाबद्दल जनजागृती घडवून आणली जाणार आहे.

   पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नागरिकांनी आणि कलाप्रेमींनी या कार्यशाळांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, कोल्हापूर केंद्रावर भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा होत आहे. या कार्यशाळेत नाव नोंदणी करण्यासाठी स्थानिक समन्वयक प्रशांत जोशी 7720088814 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पु.ल.देशपांडे कला अकादमी, मुंबई यांचे कडून करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes