काय घडलं? याचे उत्तर जयश्री जाधव यांनी कोल्हापूरकरांना द्यावे : आमदार सतेज पाटील
schedule31 Oct 24 person by visibility 500 categoryराजकीय
कोल्हापूर : फोडाफोडी करण्यामध्ये या मंडळींचा आपण गुहाटी- सुरतचा प्रवास बघितलेला आहे. त्याचाच एक प्रयत्न आज कोल्हापूरमध्ये दुर्दैवाने या ठिकाणी घडला आहे. ज्यांना आम्ही निवडणुकीमध्ये निवडून दिले. पोटनिवडणूक मध्ये कोल्हापूरकरांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून जयश्री जाधव यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले आज त्या एका रात्रीत निघून गेल्या. हे कोल्हापूरकर विसरणार नाहीत. आणि जे घेऊन गेलेत त्यांना खात्री झालेली आहे. की ते निवडून येऊ शकत नाहीत. जर माणूस निवडून येऊ शकतो याची जर खात्री शिवसेनेला असेल तर या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. मला वाटत यांच्या पायाखालील वाळू घसरलेली असून या गोष्टी घडत आहेत. परंतु कोल्हापूर जनता सुज्ञ असून ती शंभर टक्के काँग्रेसच्या बाजूने राहील याची मला खात्री आहे. तसेच काय घडले? याचे उत्तर आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूरकरांना द्यावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.
आमदार जयश्री जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत भूमिका व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार सतेज पाटील म्हणाले, या प्रक्रियेमध्ये गेल्या तीन चार वेळा मी त्यांना भेटलो. त्यांना कल्पनाही दिली होती. यावेळी तुम्ही उमेदवारी घेऊ नये अशी विनंती केली होती. त्यांनी ती मान्य केली होती. आज सकाळी मी त्यांच्या घरी जाऊन आलो, चर्चाही झाली होती. त्यांनी मान्य केले होते. अचानक काय परिवर्तन झाले मला माहित नाही. शिंदे सेनेला देखील चार्ट फ्लाईटने घेऊन त्यांना जाऊन हा प्रवेश करावा लागला. याचा अर्थ काहीतरी घडलेला आहे. जे घडले ते स्वतः कदाचित सांगतील. काय घडलं याचे उत्तर कोल्हापूरकरांना त्यांनी द्यावे अपेक्षित आहे. त्यांच्यावर व्यवसायाच्या माध्यमातून सरकारचा दबाव होता. का अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेबाबत खुलासा होणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.
विरोधकांच्या पायाखाली वाळू घसरली असून त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर ते निवडून येऊ शकत नाहीत. म्हणून हे चालेल आहे. जर स्वतःची ताकत असेल, काम केले असेल, शिंदे सेनेची ताकद कोल्हापुरात प्रचंड असेल, फोडाफोडी करायची गरज नाही. मात्र शिंदे शिवसेनेकडून हा झालेला प्रकार आमचे मताधिक्य वाढवण्यासाठी कारणीभूत ठरेल असेही आमदार सतेज पाटील म्हणाले.