SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यड्राव बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर; यड्राव को-ऑप. बँकेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्नथायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावलेल्या कोपार्डे गावच्या पैलवान गौरव पाटीलचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सत्कार१२ वी PCB नंतर करिअरच्या अमर्याद संधी : डॉ. आर. के. शर्मासंभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पूरग्रस्त भागांची पाहणी : यंत्रणेला सतर्कतेच्या सूचनाबाल संरक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा सादर करावा : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगकोल्हापुरात मुसळधार पावसाचा जोर कायम; ३३ बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पातळी ३० फुटांवरशिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानांचा शिक्षकांनी अवलंब करावा : मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहनभ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन: करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची नियुक्तीकसबा सांगावच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूडिग्री इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट शासनमान्य स्क्रुटनी केंद्र

जाहिरात

 

यड्राव बँक उद्योजक घडविण्यात आघाडीवर : आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर; यड्राव को-ऑप. बँकेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

schedule05 Jul 26 person by visibility 106 categoryउद्योग

जयसिंगपूर : ग्रामीण भागातील युवकांना उद्योग-व्यवसायासाठी भक्कम आर्थिक पाठबळ देणे, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासार्ह बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणे, या उद्देशाने यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेची वाटचाल सुरू आहे. स्वर्गीय शामराव अण्णा पाटील यड्रावकर यांनी पाहिलेले "ग्रामीण भागातून उद्योजक घडविण्याचे स्वप्न आज यड्राव बँकेच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत असून, बँकेने आपल्या ग्राहकाभिमुख धोरणामुळे राज्यातील सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

 यड्राव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. यावेळी त्यांनी बँकेला सायबर सिक्युरिटी क्षेत्रात मिळालेल्या पुरस्काराबद्दल संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे ग्राहकांचा ऑनलाइन व्यवहारांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रात यड्राव बँकेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आधुनिक आणि सुरक्षित बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम बँक यशस्वीपणे करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, "
बदलत्या काळानुसार यड्राव बँकेने UPI पेमेंट, मोबाईल बँकिंग, व्हॉट्सअॅप बँकिंग, क्यूआर कोड यांसारख्या अत्याधुनिक डिजिटल सेवा सुरू करून ग्राहकांना जलद, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांसाठी वाजवी व्याजदरात सोनेतारण कर्ज योजना सुरू करण्यात आली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ते पुढे म्हणाले की, बँकेची सातवी शाखा नेमीनाथनगर (सांगली) येथे तसेच प्रशासकीय कार्यालय जयसिंगपूर येथे लवकरच सुरू होणार आहे. विस्ताराच्या या धोरणामुळे अधिकाधिक ग्राहकांपर्यंत बँकेच्या सेवा पोहोचतील. येत्या काळात यड्राव बँक ७०० कोटी रुपयांच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा पार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सभेच्या प्रारंभी स्वर्गीय शामराव अण्णा पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचवेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते बँकेच्या नवीन "यश" या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्वागत बँकेचे व्हॉइस चेअरमन दिलीप मगदूम यांनी केले. 

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी वार्षिक अहवाल, ताळेबंद व इतर सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. बँकेचे लेखापरीक्षक व्ही. के. बस्तवडे यांनी बँकेची आर्थिक प्रगती, सक्षम आर्थिक व्यवस्थापन आणि विविध पुरस्कारांमुळे सहकार क्षेत्रात निर्माण झालेली विश्वासार्हता याबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात बँकेच्या कार्यक्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक क्षेत्र आणि इतर उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना भविष्यात उच्च ध्येय ठेवून समाजाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

सभेचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले, तर सचिन देशिंगे यांनी आभार मानले. या वार्षिक सभेला आदित्य पाटील यड्रावकर यांच्यासह सर्व संचालक बँकेचे सभासद, हितचिंतक, अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes