SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहाला गालबोट : 'भुलेश्वरचा राजा'ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाचजण जखमीमराठीच्या जादूने 'जेन झी' घायाळ! पुण्यात राहुल गांधींचा हुकमी एक्का; म्हणाले, "पुणे म्हणजे..."ऐतिहासिक विजय: हळदीच्या पेटंटचा लढा भारताने कसा जिंकला?कितीही जन्म घेतले तरी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या ॠणातून उतराई अशक्यमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जयसिंगपुरात ‘नमो उद्यान’चा लोकार्पण सोहळा श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ रोजी “श्रावण व्रतवैकल्य” उपक्रमाचे आयोजन : वैशाली राजेश क्षीरसागर यांची माहितीउर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोररंकाळा परिसरात महापालिकेची कारवाई; १४ भटकी गाढवे जप्त‘फोरसीइंग कोल्हापूर २०३५’ विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये व्यासपीठकोल्हापूर आगारात नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ ’ बस दाखल; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते लोकार्पण

जाहिरात

 

मुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहाला गालबोट : 'भुलेश्वरचा राजा'ची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, पाचजण जखमी

schedule23 Aug 26 person by visibility 149 categoryराज्य

मुंबई  : ​लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या उत्साहाला गालबोट लागले असून, शनिवारी रात्री मुंबईतील प्रसिद्ध 'भुलेश्वरचा राजा'च्या आगमन मिरवणुकीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे गणेशोत्सवाच्या आनंदात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, भुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची भव्य गणेशमूर्ती भायखळ्यावरून भुलेश्वर येथे आणली जात होती. आगमन मिरवणूक अंतिम टप्प्यात असताना आणि मंडळाच्या मंडपापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असताना अचानक ही मूर्ती कोसळली. मूर्ती अचानक खाली आल्यामुळे तिथे उपस्थित भाविकांमध्ये एकच धावपळ उडाली आणि काही लोक त्याखाली अडकले गेले.

​अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाने तत्परतेने बचाव कार्य राबवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या दुर्दैवी अपघातात संकेत नेवशे (वय ३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (वय ३०) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच, जखमी झालेल्या पाच जणांमध्ये ५ आणि ७ वर्षांच्या दोन लहान मुलींचाही समावेश आहे. या सर्व जखमींवर सध्या जी.टी. रुग्णालय, रिलायन्स रुग्णालय, सैफी रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes