SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली (पु.) चा दहावीचा निकाल ९६ टक्के; सफीया नदाफ प्रथमस्वाभिमानाचा मेरुमणी: महाराणा प्रतापकोल्हापूर महानगरपालिकेकडून उचगावमधील २०४ अनधिकृत बांधकामांना पुन्हा नोटीसकोल्हापुरात वृद्धाला लुटणारी सराईत इराणी टोळी जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल जप्तराज्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल 92.09 टक्केकोल्हापूर: जमिनीच्या वादातून झालेल्या खुनातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटकनेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एस.एस.सी. परीक्षा फेब्रु. २०२६ उर्दू माध्यमाचा निकाल ९५.६५ टक्के भाविक, पर्यटक, महिलांसाठी खासबाग मैदान, आणि ताराबाई पार्क इथं बांधलेल्या महिला स्वच्छतागृहांचे रविवार होणार लोकार्पणपन्हाळगड परिसरात 10 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागूसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा कधी पडणार?, शिवसेनेसह जिल्हाप्रमुखांचा सवाल

जाहिरात

 

अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली (पु.) चा दहावीचा निकाल ९६ टक्के; सफीया नदाफ प्रथम

schedule09 May 26 person by visibility 113 categoryसामाजिक

कोल्हापूर  : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी (मुस्लीम बोर्डिंग), कोल्हापूर संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल, शिरोली (पु.) या शाळेचा फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या एस.एस.सी. (दहावी) परीक्षेचा निकाल ९६ टक्के लागला आहे. ग्रामीण भागातील या शाळेने आपली यशाची परंपरा कायम राखली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शाळेमध्ये  सफीया अल्लाउद्दीन नदाफ हिने ९१.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.  हुमेरा बशीर जालगिरी हिने ८६.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर  सतीजा समीर पटेल हिने ८०.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, शालेय समिती चेअरमन मलिक बागवान, संचालक रफीक शेख, जहाँगीर अत्तार, हाजी पापाभाई बागवान, हाजी लियाकत मुजावर, आल्ताफ झांजी, रफीक मुल्ला आणि फारुक पटवेगार यांनी अभिनंदन केले आहे.

या यशासाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एम. एम. तहसीलदार, वर्ग शिक्षक नगरदी सर, शिक्षिका जमादार मॅडम, पटवेकर सर आणि पटेल मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes