SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वच्छ कोल्हापूरसाठी महापालिका सरसावली; सुभाषनगर आणि वर्षानगर परिसरात राबवली धडक स्वच्छता मोहीम!वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनवरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उद्ध्वस्त; शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, सिलिंडरचा साठा जप्त!धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजेव्हा भारतीय पडदा पहिल्यांदा बोलू लागला...विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा १५ मार्च रोजीअजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक​"दिल्ली दरबारी कोल्हापूरचा आवाज! कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय दिग्गजांची भेट" कोल्हापूर: अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा उद्यापासून ४ दिवस दर्शनासाठी बंद!कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!

जाहिरात

 

कोल्हापुरात वाहतूक शाखेची दमदार मोहीम : १३७ वाहनचालकांवर कारवाई, २,३२,५००/- रुपये दंड वसूल

schedule21 Nov 25 person by visibility 395 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात अल्पवयीन वाहनधारक, विना लायसन्स, तिब्बल सिट, मोबाईल टॉकींग या वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे १३७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांचेकडून २,३२,५००/- रुपये दंड करण्यात आला. ही कारवाईची मोहीम कोल्हापूर वाहतूक शाखेने केली.

कोल्हापूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरामध्ये अल्पवयीन वाहन चालक यांचेकडे तसेच तरुणवर्ग यांचेकडून शाळा, कॉलेज परिसरामध्ये वाहनांवर बसून हुल्लडबाजी करणे, तिब्बलसिट फिरणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर मोबाईलणे, लायसन्स जवळ न बाळगणे, अस्ताव्यस्त वाहन पार्क करणे तसेच लायसन न काढता वाहन चालविणे अशा प्रकारात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी दिले सुचनेनुसार आज दिनांक २१.११.२०२५ सकाळी १०.०० ते १२.०० वा. मुदतीत शहरातील विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, शहाजी कॉलेज, गोखले कॉलेज, न्य कॉलेज या परिसरात वाहतूक शाखेकडील अधिकारी व १८ पोलीस अंमलदा यांची वेगवेगळे पथक तयार करुन त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली.

तरी शहर वाहतुक नियंत्रण शाखा कोल्हापूरचे वतीने सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या अल्पवयीन पाल्यास वाहन चालविण्यास देवू नये, अपघातासारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरुण वाहनधारकांनी वाहतुकीचे नियमांचे तंतोतंत पालन करावे. वाहन चालविताना आपले सोबत ड्रायव्हींग लायसन्स व आपले वाहनांच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जवळ बाळगाव्यात अन्यथा वाहनधारकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.

ही कारवाई  अपर पोलीस अधीक्षक  यांचे मार्गदर्शनाखाली व शहर वाहतुक शाखेकडील पो.नि. नंदकुमार मोरे, यांचे निरीक्षणाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव नागेश म्हात्रे व पोलीस अंमलदार यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes