SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा १५ मार्च रोजीअजितदादा पवार यांच्या पुतळा उभारणीसाठी जागा निश्चितीबाबत महापालिकेत आढावा बैठक​"दिल्ली दरबारी कोल्हापूरचा आवाज! कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय दिग्गजांची भेट" कोल्हापूर: अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा उद्यापासून ४ दिवस दर्शनासाठी बंद!कोल्हापुरात २८ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ईद फेस्टिवल’चे 17 मार्च रोजी उद्घाटन!डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या क्रीडापटूंचा भव्य सन्मान सोहळा संपन्नचिकोत्रा नदी पात्रात 'उपसाबंदी' जाहीर! जाणून घ्या तुमच्या भागातील तारीख आणि नियम...राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया"राज्यात पावसाची एन्ट्री! १७ मार्चपासून मेघगर्जनेसह बरसणार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली."

जाहिरात

 

​"दिल्ली दरबारी कोल्हापूरचा आवाज! कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय दिग्गजांची भेट"

schedule13 Mar 26 person by visibility 156 categoryराजकीय

कोल्हापूर  : भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची भेट घेतली. पक्ष संघटन, युवकांचे प्रश्‍न, संघटनात्मक रचना याबद्दल कृष्णराज यांनी या वरिष्ठ नेत्यांकडून माहिती घेतली. तसेच युवा मोर्चाची वाटचाल कशा पध्दतीने असावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन घेतले.

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी कृष्णराज महाडिक यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या दिवसापासून संघटनेच्या कामकाजाला सुरवात केली. गेल्या तीन दिवसांपासून कृष्णराज महाडिक नवी दिल्लीत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची कृष्णराज यांनी भेट घेतली.

 त्यांच्याकडून कृष्णराज महाडिक यांनी विविध विषयांवर माहिती जाणून घेतली. युवा वर्गाचे प्रश्‍न, पक्षीय संघटन, युवकांच्या अपेक्षा, भाजपची विचारधारा आणि युवा मोर्चाचा विस्तार या अनुषंगाने कृष्णराज महाडिक यांनी भाजपच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन घेतले. जास्तीत जास्त युवकांना भाजपचे सदस्यत्व देणे, युवापिढीसाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणे, यासह अनेक मुद्दयांवर कृष्णराज यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चा अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्याशी चर्चा केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes