+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule26 Jul 24 person by visibility 279 categoryराज्य
  कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 1,3, 4,5,6 व 7 हे 6 दरवाजे खुले असून सध्या धरणातून 10 हजार 68 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी व घुंगुरवाडी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे, मांडुकली व असळज, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे, पानोरे, म्हसुर्ली व शेळोशी वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, शाळी नदीवरील- येळाणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी, दत्तवाड व तुरुंबे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, जरळी, हजगोळी, भादवण, गजरगाव व गिजवणे. घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी. चित्री नदीवरील परोली असे एकूण 95 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.36 टीएमसी, तुळशी 3.13 टीएमसी, वारणा 30.52 टीएमसी, दूधगंगा 20.39 टीएमसी, कासारी 2.21 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.12 टीएमसी, पाटगाव 3.50 टीएमसी, चिकोत्रा 1.08 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 44.6 फूट, सुर्वे 42.7 फूट, रुई 71.8 फूट, इचलकरंजी 68.6 फूट, तेरवाड 62.6 फूट, शिरोळ 59.6 फूट, नृसिंहवाडी 59 फूट, राजापूर 47.10 फूट तर नजीकच्या सांगली 36.6 फूट व अंकली 39.3 फूट अशी आहे.
 
🔴 जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 67 मिमी पाऊस; शाहुवाडी तालुक्यात 123.8 मिमी पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 67 मिमी पाऊस झाला असून काल दिवसभरात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 123.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 71.6 मिमी, शिरोळ -44 मिमी, पन्हाळा- 91.9 मिमी, शाहुवाडी- 123.8 मिमी, राधानगरी- 94.4 मिमी, गगनबावडा- 39.5 मिमी, करवीर- 67.7 मिमी, कागल- 41.7 मिमी, गडहिंग्लज- 49.6 मिमी, भुदरगड- 65.2 मिमी, आजरा- 68.8 मिमी, चंदगड- 32.7 मिमी असा एकूण 67 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.