‘गोकुळ कडून म्हैस दुध खरेदी दरात १ रुपये ५० पैसे वाढ’; गाय दूध खरेदी दरात २ रूपये कपात : चेअरमन अरुण डोंगळे
schedule30 Sep 23 person by visibility 5863 categoryउद्योग
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. तरी दि.०१ ऑक्टोंबर पासून म्हैस दूध ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये १ ने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे.
दि.३० सप्टेंबर रोजीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली .
दिनांक ०१ ऑक्टोंबर रोजी पासून दुध पुरवठा करणाऱ्या जिल्ह्या व जिल्ह्याबाहेरील दुध उत्पादकांच्या गाय दुध खरेदी दरामध्ये २ रुपये कपात करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र मध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. बाजारपेठेतील दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून गाय दूध खरेदी दर कमी करणेत येत आहे.
म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ४९.५० वरून रूपये ५०.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५१.३० वरून रूपये ५२.८० करण्यात आला आहे.
गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३५.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे.
तसेच दि.०१ ऑक्टोंबर रोजी पासून सुधारित दरपत्रक लागू होईल. संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.