SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक सिंह दिन: जंगलाच्या राजाचे जतन आणि संवर्धनकोल्हापुरात १८५० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन; हद्दवाढीसह विविध प्रकल्पांना गतीविभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्यावत सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्यात येईल : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारराज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिवसा मोफत वीज आणि थकबाकीमुक्त प्रमाणपत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससैनिक टाकळी एमआयडीसीवरून आंदोलक आणि आमदार यड्रावकर यांच्यातील चर्चा फिस्कटलीमास मीडियातून जनहिताला प्राधान्य द्या: प्रा. डॉ. ज्योती जाधवए.आय. ज्ञाननिर्मितीचे नव्हे; माहितीचे साधन: डॉ. ज्ञानेश्वर गटकरमहापालिकेच्यावतीने क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पणपद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य सामान्य माणसाला दिलासा देणारे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आगमन

जाहिरात

 

भागीरथी महिला संस्थेतर्फे खासदार महोत्सवांतर्गत आज रंगणार १० हजार महिलांची झिम्मा फुगडी स्पर्धा, ५ लाखांची बक्षिसे, विविध मालिकेतील कलाकारांची हजेरी

schedule16 Sep 25 person by visibility 694 categoryमनोरंजन

कोल्हापूर  : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने खासदार महोत्सवांतर्गत आज मंगळवारी झिम्मा फुगडी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून, स्पर्धेसाठी १० हजार महिलांनी नाव नोंदणी केली आहे. या स्पर्धेला प्रसिध्द मराठी कलाकार प्राजक्ता माळीसह एकाहून एक सरस कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच या स्पर्धेचे चॅनेल बी वरून आणि युटयूबद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

पारंपारिक लोककलेचे संवर्धन करण्याच्या हेतुने, भागीरथी महिला संस्थेतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा घेतली जाते. यावर्षी भागीरथी महिला संस्थेसह भागीरथी युवती मंच, भागीरथी नागरी पतसंस्था आणि भाजपच्यावतीने खासदार महोत्सवांतर्गत मंगळवारी ही स्पर्धा रंगणार आहे. लाईन बाजार शेजारील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार्‍या स्पर्धेला कोल्हापूर जिल्हयासह शेजारील जिल्हयातून आणि कर्नाटक तसेच कोकणातून महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी १० हजार महिलांनी नाव नोंदणी केली आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. 

या स्पर्धेसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह नुकताच प्रदर्शित झालेल्या हॅलो कदम चित्रपटातील अभिनेत्री आणि कोल्हापूरच्या कन्या श्‍वेता कामत, कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेतील शाश्‍वती पिंपळकर आणि प्राजक्ता परब, अशोक मा. मा. या मालिकेतील रसिका वखारकर, इंद्रायणी मालिकेतील कांची शिंदे, क्षमा देशपांडे, सन मराठी टिव्हीवरील जुळली गाठ गं या मालिकेतील अभिनेत्री सुरेखा कुडची तसंच स्टार प्रवाहवरील हळद रूसली कुंकू हसलं या मालिकेतील समृध्दी केळकर आणि अभिषेक रहाळकर तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी या मालिकेतील सोनाली पाटील, पुजा काळे, अमृता धोंगडे आणि कादंबरी माळी या स्पर्धेला भेट देवून महिलांशी संवाद साधणार आहेत.

 त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने पारंपारिक खेळांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोचावा, यासाठी रिल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेचे उत्तम रिल बनवणार्‍या स्पर्धकांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार आणि १ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. स्पर्धेचे प्रायोजक म्हणून गजानन गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, जिजाई मसाले आणि काले बजाज चेतक काम पाहत आहेत. आज महासैनिक दरबार हॉलवर या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून,सौ. अरूंधती महाडिक यांनी याबाबतची पाहणी केली. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनीही स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. या स्पर्धेच्या माध्यमातून हजारो महिलांसाठी आनंदाची पर्वणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बी चॅनेलच्या 532 क्रमांकाद्वारे आणि युटयूबवर पाहता येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes