SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रात 'क्लीन अँड ग्रीन'चा आदर्श : जिल्हाधिकारी अमोल येडगेमहिला संरक्षणाला विशेष प्राधान्य, अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांचे प्रतिपादनईदनिमित्त कुर्बानीसाठी कत्तलखान्यात व्यवस्थाडी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरालिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण : समीक्षाचा खून, सतीश यादवची आत्महत्यासंजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी प्रणव भोपळे याचे चौथे वर्ल्ड रेकॉर्ड!सैनिकी मुला, मुलींच्या वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पद भरतीबेंगळुरू स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यूआगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात : नामदार चंद्रकांतदादा पाटील ‘गोकुळ’ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जाहिरात

 

डिजिटल मीडियाला मिळाली राजमान्यता; राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश

schedule03 Jun 25 person by visibility 344 categoryराज्य

मुंबई  : राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबत चे परिपत्रक आज दिनांक ३ जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्षे या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटी पर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडिया मधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालेल्या महा अधिवेशनादरम्यान सुद्धा तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार चंद्रकांत दादा पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुरावामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे.

▪️राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा यशस्वी पाठपुरावा
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील12हजार हून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत सन २०१९ पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राज मान्यता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहिल्याने अखेर यश मिळाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes