संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारत पुर्नंबांधनी कामाचा उद्या सोमवारी भूमीपूजन सोहळा
schedule13 Oct 24 person by visibility 363 categoryमहानगरपालिका
▪️ मुंबईच्या लक्ष्मी हेरिकॉन प्रा.लि. ची अंदाजपत्रकीय दराच्या 0.99 टक्के इतक्या कमी दराची निविदा मंजूर
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह इमारत पुर्नंबांधनी कामाचा सोमवार, दि.14 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 7.00 वाजता पालकमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार धनंजय महाडीक, खासदार श्री शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, श्रीमती जयश्री जाधव, ऋतूराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे.
संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह इमारतीला दि.08 ऑगस्ट 2024 रोजी आग लागली. यानंतर महापालिकेने तातडीने केशवराव भोसले नाटयगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करणेसाठी दि.09 ऑगस्ट 2024 रोजी दरपत्रके (कोटेशन) मागविली. नाट्यगृह इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी 6 सल्लागारांकडून दरपत्रके सादर झाली. त्यापैकी सर्वात कमीचा देकार असलेल्या स्ट्रक्टवेल डिझाईनर्स व कंन्सल्टंट प्रा.लि., नवी मुंबई यांना स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे काम दि.15 ऑगस्ट 2024 रोजी कार्यादेश देण्यात आला.