कोल्हापुरात गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना 'नो एन्ट्री
schedule20 Sep 23 person by visibility 457 categoryमनोरंजन
कोल्हापूर: नृत्यांगणा गौतमी पाटीलची सद्या मोठी क्रेझ आहे.मात्र नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर कोल्हापुरात बंदी घालण्यात आली आहे. याबाबत गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून कोल्हापुरात तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील नंदगाव अन् राधानगरीतील राशिवडे येथे नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे काही तरुण मंडळांनी आयोजन केले होते. मात्र पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.
नृत्यांगणा गौतमी पाटीलची सद्या मोठी क्रेझ आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात राडे देखील झाले आहेत.