SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्याकडून शहरातील मतदान केंद्रांची पाहणीजिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका मतदारांना आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी ‘टेकस्प्रिंट : डायमेन्शन एक्स’ हॅकेथॉनचे आयोजनकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : आज मतदान, उद्या समजणार करेक्ट कार्यक्रमबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापरकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक विभागातील 2 हजार 975 अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवानासंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा केएलई युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्जांसाठीचे पोर्टल २२ जानेवारीपर्यंत सुरूआयआयएम बेंगलोर–तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय चर्चासत्रप्री, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जाहिरात

 

डी.के.टी.ई. मध्ये ‘टेक-सिंपोझियम २५‘ आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक स्पर्धा उत्साहात

schedule19 Mar 25 person by visibility 643 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : अभियंत्यांना ज्या उद्योगजगतात काम करायचे आहे त्याची ओळख व्हावी व कॅम्पस इंटरव्हयू देत असताना त्यांना आत्मविश्‍वास यावा यासाठी टेक-सिंपोझियम सारख्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपल्या तांत्रिक कलेस वाव देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन नितीन कनवाडे - जनरल मॅनेजर, ऑपरेशन टाटा मोटर्स यांनी डीकेटीईमध्ये ‘टेक-सिंपोझियम २०२५‘ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी काढले.

टीसीएस बीएफएसआय युनिट चे वरिष्ट सल्लागार आणि डिलिव्हरी पार्टनर हेमंत सुरवसे यांनी आपल्या मनोगतात,एआय हे तंत्रज्ञान समस्या सोडवणे, गुंतागुंतीची कामे स्वयंचलित करणे आणि नवोउपक्रमांना चालना देवून अभियांत्रिकी शिक्षण आणि क्षेत्रात क्रांती घडवून आणणे जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरलेले नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान व आधुनिक लॅबरोटरी डीकेटीई मध्ये उपलब्ध असल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी डीकेटीईमध्ये सॉफटवेअर ट्रेनिंगचे वेळोवेळी आयोजन केल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकविण्यास फायदा होत आहे असे नमूद केले.

टेकसिंपोझियम- २५ ही स्पर्धा विद्यार्थ्यांची तांत्रिक प्रविणता, सॉफट स्किल, ऍप्टीटयूड आणि स्पर्धात्मक धार वाढविण्यासाठी एक गतीमान व्यासपीठ म्हणून काम करते. अपडेट राहण्यासाठी आणि उदयोगासाठी तयार राहण्यासाठी आवश्यक असलेले गुण या कार्यक्रमात विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग दिसून आला ज्यामुळे कल्पना, ज्ञान आणि दृष्टीकोनांची देवाणघेवाण झाली.या कार्यक्रमाचे उदघाटन ऑडीटरीएम हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन पार पडले.

 यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक, रवी आवाडे, डायरेक्टर डॉ एल एस अडमुठे, डीन, डॉ.एस.के. शिरगावे व सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे समन्वयक म्हणून डी.एम. कुलकर्णी यांनी काम पाहिले.  


अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांना चालना मिळावी यासाठी डीकेटीई तर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. सीएसई, एआयएमएल व डेटा सायन्स विभागांनी टेक नोव्ही २.०, ए.आय. पॉवर्ड कोडिंग आणि डेटा स्प्रिंटचे आयोजन केले. सिव्हील विभागाने कॅड वॉर आणि सर्व्हे स्प्रिंटचे आयोजन केले होते.ज्यामध्ये स्ट्रक्चरल आणि विश्‍लेषणात्मक कौशल्यांची चाचणी घेण्यात आली. ईएनटीसी व इलेक्ट्रीकल विभागामार्फत कोड ऑरा, बॅटल बॉटस, एस्केप रुम आणि इलेक्ट्रो हंट सादर केले. मेकॅनिकल विभागामार्फत डिझाईन आणि मॉडेलिंग कौशल्यावर लक्ष केंद्रीत करुन मातीचा खेळ आणि कॅडवार चे आयोजन केले होते.

 विविध स्पर्धांमध्ये एकूण १४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमात विविध टेक्नीकल स्पर्धेमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी अग्रेसर होते. सर्व अभियांत्रिकी शाखांमधील तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes