SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागतमहिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृहकोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चितऊसतोड मजूर आणि साखर कारखाने दोघांनाही मिळणार न्याय; खा. धनंजय महाडिक यांनी सुचवला सुवर्णमध्य!‘गोकुळ’ची दमदार प्रगती ठेवी ६०४ कोटीवर ; दूध संकलन २५ लाख लिटरचे उद्दिष्ट : नामदार हसन मुश्रीफशेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची : न्या.अभय आहुजाकोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोपगॅसचा जिल्ह्यात पुरेसा साठा; नागरिकांनी आवश्यकतेनुसारच सिलेंडर बुकिंग करावे : पालकमंत्री१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस​"सरकारी नोकरी सोडून समाजक्रांतीचा ध्यास घेणारे: मान्यवर काशिराम!"

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

schedule15 Mar 26 person by visibility 112 categoryराज्य

कोल्हापूर  : कागल येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सायंकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.कोल्हापूर येथील एका विवाह सोहळ्यामध्येही मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.

    वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी त्यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही आगमन झाले.

  तत्पूर्वी, विमानतळावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले.

   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या विमानतळावरील स्वागताला आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, खा.धनंजय महाडिक, खा.धैर्यशील माने, महापौर रूपाराणी निकम, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे,महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी,पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes