+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule23 Jul 24 person by visibility 390 categoryदेश
कोल्हापूर : आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनेला वेगाने मुर्तस्वरूप देण्यासाठी आजचा केंद्रीय अर्थसंकल्प महत्वाचा आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, युवक, उद्योजक आणि गोरगरीबांच्या अपेक्षांचा आणि गरजांचा विचार करून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी हा परिपूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी रूपयांची तरतुद म्हणजे देशाच्या विकासाचा भक्कम पाया आहे. तर शेतकर्‍यांनाही या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. 

रोजगार, कौशल्य विकास, शिक्षण, शहरीविकास, गरीबांसाठी घरकुल, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्यांक मागास घटकांचा विकास अशा सर्व मुद्दयांचा समावेश असलेला मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटेवर नेणारा आहे. असे धनंजय महाडिक म्हणाले.