केआयटी मेकॅनिकलच्या १५५ हून अधिक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
schedule19 Jun 23 person by visibility 1288 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : केआयटीच्या अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या अंतिम वर्षातील १५५ हून अधिक विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड झाली आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा टेक्नोलॉजीज, अदानी ग्रुप, टाटा पॉवर, टी.सी.एस, जे.एन.के, जनरल इलेक्ट्रिकल , विप्रो पारी ऑटोमेशन , अटलास कॉपको ,कारगिल फुड्स, के.एस.बी. पंप, रिगल रेक्सनोर्ड, फॉरेशिया, डी.एक्स.सी, नॉर ब्रेमसे या सारख्या प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.
मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या सर्वच विद्यार्थ्यांचे चांगल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होण्यासाठी विभागाकडून विद्यार्थी तृतीय वर्षात असल्यापासून अप्टीट्युड ट्रेनिंग, इंटरव्ह्यू स्किल्सचे प्रशिक्षण दिले जाते. कॅम्पस प्लेसमेंट साठी येणाऱ्या कंपनीच्या क्षेत्रानुसार विभागाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा वा मुलाखत मध्ये होतो.
विभागाच्या अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना अंतिम सेमीस्टर साठी पूर्णवेळ इंडस्ट्रिअल इंटर्नशीप करावी लागते. सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीमध्ये इंटर्नशीप मिळावी व विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे इंटर्नशीप पूर्ण करण्यासाठी विभागाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शन करतात. पूर्ण वेळ इंटर्नशीप केल्याचा विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या इंटरव्ह्यू मध्ये खूपच चांगला फायदा होतो.
विभागामध्ये प्रॉब्लेम आणि प्रोजेक्ट बेस्ड लर्निग राबवले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडविण्याची क्षमता, टीमवर्क, संभाषण कौशल्य, प्रॅक्टिकल ज्ञान मध्ये प्रगती होते. याच बरोबर प्रॅक्टिकल बेस्ड लर्निग, इंडस्ट्रिअल व्हिजीट मुळे विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक कौशल्ये विकसित होण्यामध्ये खूपच चांगला फायदा होतो.टाटा टेक्नॉलॉजीज च्या ‘रेडी इंजिनिअर प्रोग्राम’ मध्ये मागील ३ वर्षात केआयटी मेकॅनिकल विभाग देशभरात पहिल्या ३ मध्ये सातत्याने येत आहे. अशा विकसित कौशल्याचा फायदा विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू मध्ये होत आहे.
या वर्षी कॅम्पस प्लेसमेंट साठी येणाऱ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर पेक्षा पारंपरिक मेकॅनिकल मधील कंपन्यांचा जास्त सहभाग होता. ही विशेष बाब आहे.सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये विभागाच्या विद्यार्थ्यांचे खालीलप्रमाणे कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड झालेली आहे.
🔴 कंपनीचे नाव वार्षिक पगार / पॅकेज
(लक्ष/प्रतिवर्ष)
१.टाटा पॉवर ६.६४
२. अदानी ग्रूप ६.०
३.टाटा टेक्नॉलॉजी ५.६५
४. फॉरेशिया ५.५
५.नॉर ब्रेमसे ५.५
६.रिगल रेक्सनॉर्ड ५.०
७.जे एन के लिमिटेड, ठाणे ५.०
८.कारगिल फूड्स ५.०
९.के एस बी पंप्स प्रायव्हेट लिमटेड ४.५
१०.ब्रोसे इंडिया ४.५
११.विप्रो पारी ऑटोमेशन ४.५
१२.डी एक्स सी टेक्नॉलॉजी ४.२
१३.इन्फ्रा मार्केट ४.०
१४.वेलमेड लॉकिंग सिस्टीम ३.७
१५.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी सी एस) ३.४
संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, केआयटीचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष, श्री. साजिद हुदली, सचिव, दीपक चौगुले, तसेच अन्य सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे डॉ. अमित सरकार, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. उदय भापकर यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. मेकॅनिकल विभागाचे प्रा. प्रवीण गोसावी, प्रा. आशिष पाटील व प्रा. निलेश देसाई यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये विशेष प्रयत्न केले.