SMP News Network
एकच लक्ष्य .. सदैव दक्ष ..
Register
Breaking : bolt
कोल्हापूर विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रकाशनकोल्हापूर विभागात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार : बोर्डाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागरसहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण...एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करारकोल्हापूर जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश जारीमहिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाडआ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराजउदारमतवादी, लोकशाहीवादी पहिले पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरूतावडे हॉटेल नजीक घडलेल्या फसवणूकीतील 25.53 लाख रु. घेवून जाणाऱ्या एकाविरुद्ध गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

स्वाभिमानी कोल्हापूरकर महिलांच्या अपमानाचा बदला घेणार : सतीशचंद्र कांबळे

schedule12 Nov 24 person by visibility 167 categoryराजकीय

कोल्हापूर : भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी दादागिरीची भाषा वापरली. त्यांची व्यवस्था लावण्याची भाषा केली. मात्र स्वाभिमानी कोल्हापूरकर महाडिकांकडून महिलांचा झालेल्या अपमानाचा बदला घेऊन त्यांचीच व्यवस्था करतील अशा इशारा कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी दिला. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ टेंबलाईवाडी येथे आयोजित  सभेत ते  बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमख उपस्थिती होती.

कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे पुढे म्हणाले, पाच वर्षात मतदारसंघात ढूंकूनही न पाहणारे माजी आमदार अमल महाडिक यांना निवडणुक आल्यावरच जनतेची आठवण होते. पाच वर्षात दुर्बिणीने शोधले असते तरी ते सापडले नसते. आमदार सतेज पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदारसंघाला विकासाच्या क्षितिजावर घेऊन जात असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांना सर्वांनी मताधिक्यांना निवडून आणुया.

आमदार सतेज पाटील म्हणाले, दक्षिण मतदार संघातील जनतेचे प्रेम, ताकद सदैव माझ्या पाठीशी राहिली आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात प्रामाणिकपणे, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम केले आहे. आपला आमदार म्हणून त्यांना सर्वांनी साथ द्या.

लाडकी बहीण योजनेवरुन महाडिकांनी महिलांचा अपमान केला आहे. महाडिकांना एवढा अहंकार कुठला? बोलून खोटी माफी मागून काय उपयोग? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केला. 

आम आदमी पार्टीचे संदीप देसाई म्हणाले, लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन सरकार बहिणींवर उपकार करत नाही. पैसे देऊन केला जाणारा अपमान ताराराणीच्या रूपातील महिला सहन करणार नाहीत.

पाच वर्षे मतदार संघात न फिरकणाऱ्या माजी आमदारांना मतदारसंघाचा विकास कसा दिसणार असा सवाल माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे यांनी केला. 

यावेळी माजी नगरसेविका शोभा कवाळे, प्रवीण केसरकर, सुनील धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगरसेवक रशीद बारगीर, पापालाल सय्यद, निरंजन कदम, राजेंद्र पाटील, सागर पाटील, राजेंद्र कांबळे, डी. एम. पाटील, सुभाष पाटील, बबन रानगे, दत्ता वारके, दिलीप पवार, मंगल खुडे, अशोक मुसळे, सचिन काटकर, सचिन शेंडे, नागेश पाटील, सतीश शिंदे, अमित कवाळे आदी उपस्थित होते.

Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes