प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान : आ.ऋतुराज पाटील
schedule13 Nov 24 person by visibility 170 categoryराजकीय
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या दौलतनगर, शाहूनगर, लक्षतीर्थ वसाहतसह दक्षिण मतदारसंघातील अनेक कुटुंबाना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देऊ शकलो याचे समाधान आहे. उर्वरित नागरीकांच्या प्रॉपर्टी कार्डसाठीही यापुढील काळात पाठपुरावा करू अशी ग्वाही आ.ऋतुराज पाटील यांनी दिली. दौलतनगर, प्रतिभानगर, शाहूनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रे दरम्यान ते बोलत होते.
आ.पाटील पुढे म्हणाले, दौलत नगर, शाहूनगर, प्रतिभानगर परिसराने मला नेहमीच प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. या भागातील अनेक लोकांचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. प्रॉपर्टी कार्ड नसल्याने अनेक नागरिकांनी अनेक समस्याना तोंड द्यावे लागले होते. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण अग्रक्रम दिला. याबाबत सातत्याने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिली. यापुढील काळातही येथील नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यासठी कार्यरत राहू. आपण केलेले स्वागत आणि प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमचा नातू म्हणून मतदानरुपी आशीर्वाद द्या.
दौलतनगर, प्रतिभानगर, शाहूनगर येथे झालेल्या या पदयात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कै.अण्णा मोगणे स्पोर्ट्स, जय बजरंगबली मित्र मंडळ, नागपंथी डवरी वसाहत तरुण मंडळ, करवीरकाशी मित्र मंडळ, अनिल स्पोटर्स, श्री ग्रुप, आशीर्वाद तरुण मंडळ, साई एकता मित्र मंडळ, आर के ग्रुप, सत्यम मित्र मंडळ, कट्टा ग्रुप, अष्टविनायक तरुण मंडळ, बालाजी तरुण मंडळ, हनुमान मित्र मंडळ, चान्सलर स्पोर्ट तरुण मंडळ, त्रिशूल तरुण मंडळ, ओम गणेश तरुण मंडळ, भगतसिंह तरुण मंडळ, टॉप टेन तरुण मंडळ, व्ही के फॅन्स ग्रुप सह विविध मंडळांनी आमदार पाटील यांचे स्वागत केले. यावेळी जय शिवराय मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आ.ऋतुराज पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.
माजी नगरसेविका संगीता देवेकर, सुरेश ढोणुक्षे, अनिल देवेकर, महेश कोरवी, काका पाटील, अमर पाटील, उदय साळोखे, आशिष देसाई, सुहास पाटील, शिवराम चिखलीकर, किरण निकम, अब्बास माने, अमोल देशिंगकर, नितीन देसाई, विशाल राजापुरे, नागेश जाधव, सुनील मोरे, उदय धोंगडे, विशाल कल्याणकर, काका पाटील, भैय्या शेटके, उमेश पोवार, शशिकांत पवार, राजू सांगवकर, सुरज नलवडे, उमेश पवार, रणजीत शिंगाडे, अनिल कलकुटकी, किरण कदम, अमर कलकुटकी, छोटू घाटगे, मंगेश गायकवाड, परसू पोवार, बंटी पोवार, अक्षय जितकर, दीपक जितकर, प्रसाद कदम, योगेश कदम, वैभव जाधव आदि उपस्थित होते.